२९ रोजी सरपंच आरक्षण सोडत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 13:16 IST2021-01-22T13:15:59+5:302021-01-22T13:16:05+5:30

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व ५९५ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात येणार आहे. यांतर्गत २९ जानेवारी ...

Sarpanch leaving reservation on 29th | २९ रोजी सरपंच आरक्षण सोडत

२९ रोजी सरपंच आरक्षण सोडत

 लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यातील सर्व ५९५ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहिर करण्यात येणार आहे. यांतर्गत २९ जानेवारी आणि चार फेब्रुवारी रोजी सोडत काढली जाणार आहे.  
जिल्ह्यातील ५९५ ग्रामपंचायतींपैकी ७६ ग्रामपंचायती ह्या पेसाबाहेरील तर ५१९ ग्रामपंचायती ह्या पेसांतर्गत क्षेत्रात आहेत. या सर्व ग्रामपंचायतीत आरक्षण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. यानुसार २९ रोजी नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील पेसा बाहेर असलेल्या ७६ ग्रामपंचायतींचे आरक्षण काढले जाणार आहे. यातील महिलांचे आरक्षण मात्र जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढले जाईल. ४ फेब्रुवारी रोजी ५१९ ग्रामपंचायतींपैकी महिला आरक्षण असलेल्या ग्रामपंचायतींची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयात होणार असल्याची माहिती महसूल सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

Web Title: Sarpanch leaving reservation on 29th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.