शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांच्या स्वागतासाठी सजले सारंगखेडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 11:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : दत्त जयंतीनिमित्त सारंगखेडा ता. शहादा येथे परंपरेनुसार साजरा होणाऱ्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : दत्त जयंतीनिमित्त सारंगखेडा ता. शहादा येथे परंपरेनुसार साजरा होणाऱ्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होत आहे. या या यात्रेसाठी मंदिर ट्रस्टी, भाविकांसह व्यापारी व प्रशासन स्तरावरुनही तयारी पूर्ण झाली आहे. एकमुखी दत्ताच्या दर्शनासाठी केवळ महाराष्टÑच नव्हे तर परराज्यातील भाविकही नवस फेडण्यासाठी येऊ लागले आहे.सारंगखेडा येथे श्री एकमुखी दत्ताच्या यात्रेनिमित्त विख्यात घोडेबाजार भरविला जात आहे. यात्रेसाठी मंदिर ट्रस्टमार्फत संपूर्ण तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांच्या मनोरंजनासाठी अवघ्या महाराष्टातून पाळणे, तमाशा मंडळे व अन्य व्यावसायिक दाखल झाले आहेत. त्याशिवाय शेतीसाठी लागणारी अवजारेही विक्रीसाठी दाखल आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी अनेक प्रकारची अवजारे उपलब्ध होणार आहेत. गृहिणींसाठी आधुनिक संसारोपयोजी साहित्य विक्रत्यांनी आणले आहे. बालकांसाठी नानाविध खेळण्या आल्या असून यात्रेत येणाºया बालकांसाठी सारंगखेड्यात आनंदाची मोठी मेजवानीच राहणार आहे.यात्रेसाठी महसुल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य व स्वच्छता विभाग यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासनही सज्ज झाले आहे. प्रशासनामार्फत भाविकांच्या सुविधा, सुरक्षा, आरोग्यासाठी विविध पथके तयार करण्यात आली आहे.कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलीक सपकाळे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे हे अधिकारी त्यांच्या फौजफाट्यासह सज्ज झाले आहे. यात्रेच्या कालावधीत सुरक्षेसाठी एक डीवायएसपी, एक पोलीस निरीक्षक, १० पोलीस उपनिरीक्षक, १३० पोलीस कर्मचारी, १३० गृहरक्षक दलाचे जवान, ३० महिला पोलीस, ४० महिला होमगार्ड यांच्यासह एक बॉम्बशोधक पथक, एक श्वान पथक तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय बाजारपेठेत पोलीस चौक्याही उभारण्यात आल्या आहे.भाविकाना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंग रावल यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सुशिलाबाई मोरे, उपसरपंच देवेंद्रसिंग रावल, ग्रामसेवक पी.डी. पाटील हे सज्ज झाले आहेत.भाविकांना स्वच्छता, आरोग्य, शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून सुविधा करण्यात आल्या आहेत. यासाठी स्वतंत्र कर्मचारीही नेमण्यात आले आहे. त्यात ३५ सफाई कर्मचाºयांचा देखील समावेश करण्यात आला आहे. सफाई कर्मचारी हे २४ तास कार्यरत राहणार असल्याचे सांगण्यात आले. आरोग्य विभागामार्फत डॉ. किशोर पाटील हे त्यांच्या पथकासह परिश्रम घेत आहे.वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता टी.एन.मन्सुरी यांनी यात्रेत येणारे भाविक व व्यापाºयांना आवश्यकतेनुसार वीज पुरवठा करण्यासाठी नियोजन केले आहे. त्यासाठी अतिरिक्त विद्युत रोहित्राची व्यवस्था करण्यात आली आहे. तर गावातील प्रत्येक रोहित्राच्या ठिकाणी कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. त्याशिवाय दोन वीज वितरणचे दोन पथके देखील कार्यान्वित करण्यात आले आहेत.