सारंगखेड्यात रॅपिड चाचणीत नऊ जण पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:28 IST2021-04-12T04:28:01+5:302021-04-12T04:28:01+5:30

सारंगखेडा येथे झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी वाढती रुग्णसंख्या ...

In Sarangkheda, nine people tested positive in the rapid test | सारंगखेड्यात रॅपिड चाचणीत नऊ जण पाॅझिटिव्ह

सारंगखेड्यात रॅपिड चाचणीत नऊ जण पाॅझिटिव्ह

सारंगखेडा येथे झालेल्या बैठकीत प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी वाढती रुग्णसंख्या पाहता सारंगखेडा येथील किराणा व्यावसायिक, पानटपरीधारक, भाजीपाला, फळ विक्रेते, शेती साहित्याशी निगडित असलेली दुकाने त्याचबरोबर हॉटेल्स, चहा स्टॉल, दूध विक्रेते आदी व्यावसायिकांच्या रॅपिड चाचण्या करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता. त्याबाबत पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, सरपंच पृथ्वीराजसिंग रावल व ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे यांच्या मार्गदर्शनाखाली ध्वनिक्षेपकाद्वारे गावात आवाहन केले होते. रविवारी झालेल्या रॅपिड चाचणीत १७७ व्यापारी व कर्मचाऱ्यांनी चाचणी करण्यात आली. त्यात नऊ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना दुकाने उघडू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या. त्यांच्यावर औषधोपचार करून घरीच राहण्याचा सल्लाही आरोग्य विभागाकडून देण्यात आला. घरात व्यवस्था नसेल तर विलगीकरण कक्षात दाखल होण्यासाठी सांगण्यात आले. रॅपिड चाचणीसाठी सरपंच पृथ्वीराज रावल, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे, पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ, मंडळ अधिकारी जुबेर पठाण, तलाठी एस.एन. डिगराळे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी, महसूल कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. रॅपिड चाचणी करण्याकामी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मनोहर मोरे, डॉ. विनायक गिरासे, डॉ. तुषार निकम, आरोग्य सेवक बी.के. भावसार, जे.बी. गिरासे, एम.आर. वसावे, एम.बी. निकम, ए.एम. पवार, आरोग्य सहायक आर.आर. महिरे, आर.जी. रावल यांनी परिश्रम घेतले.

Web Title: In Sarangkheda, nine people tested positive in the rapid test