नंदुरबारातील संजय इंदिरा नगरात तीन दुचाकी जाळल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 11:29 IST2019-02-13T11:29:05+5:302019-02-13T11:29:12+5:30

नंदुरबार : शहरातील संजय इंदिरा नगरात अज्ञात व्यक्तींनी तीन दुचाकी जाळून नुकसान केल्याची घटना रविवारी रात्री घडली़ याप्रकरणी पोलीसात ...

Sanjay in Nandurbar burned three bits of fire in Indira town | नंदुरबारातील संजय इंदिरा नगरात तीन दुचाकी जाळल्या

नंदुरबारातील संजय इंदिरा नगरात तीन दुचाकी जाळल्या

नंदुरबार : शहरातील संजय इंदिरा नगरात अज्ञात व्यक्तींनी तीन दुचाकी जाळून नुकसान केल्याची घटना रविवारी रात्री घडली़ याप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल आहे़
संजय इंदिरा नगरातील विनोद चुनीलाल पावरा यांची विनापासिंग, परेश जैन यांच्या मालकीची एमएच १९ सीजी ७२४७ तर महेंद्र पांडुरंग बडगुजर यांच्या मालकाची जीजे २६ एल ६६०५ या तीन मोटारसायकली रविवारी रात्री ११़३० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने पेटवल्याचे दिसून आले़ तिन्ही घरांबाहेर आगीचे लोळ उठत असल्याचे ध्यानात आल्यावर रहिवाशांची एकच धावपळ उडाली होती़ बाहेर आल्यावर पाहिले असता, तिघी मोटारसायकली जळून खाक झाल्या होत्या़ याप्रकरणी विनोद पावरा यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपीविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे़

Web Title: Sanjay in Nandurbar burned three bits of fire in Indira town