Sand dumper lumps from tahsil office | तहसील कार्यालयातून वाळूचा डंपर लंपास

तहसील कार्यालयातून वाळूचा डंपर लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा तहसील कार्यालय आवारातून दोघांनी वाळूने भरलेले ट्रॅक्टर लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहादा तहसील कार्यालयात कारवाई करून वाळूने भरलेला ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली होती. २२ ते २४ तारखेच्या दरम्यान बलराम आप्पा पवार रा.लोणखेडा व दिपक मोहन मोरे रा.तुळशीरामनगर यांनी ट्रॅक्टर वाळूसह तेथून नेले. याबाबत तहसील कार्यालयातील कर्मचारी जिजाबराव नथा पाटील यांनी फिर्याद दिल्याने बलराम पवार व दिपक मोरे यांच्याविरुद्ध एक लाख रुपयांचे ट्रॅक्टर व तीन हजार रुपयांची वाळू चोरी प्रकरणी शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार फुलपगारे करीत आहे.
दरम्यान, कोरोनामुळे सर्वत्र शुकशुकाट असतांना आणि महसूलचे कर्मचारी उपाययोजनांमध्ये गुंतलेले असतांनाची संधी साधत दोघांनी जप्त केलेले ट्रॅक्टर नेल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Sand dumper lumps from tahsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.