प्रकाशा व तळोद्याला जोडणारा सद्गव्हाण पुल ठरतोय धोकेदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 12:14 IST2019-04-04T12:14:19+5:302019-04-04T12:14:25+5:30
प्रकाशा : प्रकाशा व तळोदा या गावांना जोडणारा सद्गव्हान पूल अपघाताचे केंद्र बनत आहे. या पुलाच्या लोखंडी सळ्या बाहेर ...

प्रकाशा व तळोद्याला जोडणारा सद्गव्हाण पुल ठरतोय धोकेदायक
प्रकाशा : प्रकाशा व तळोदा या गावांना जोडणारा सद्गव्हान पूल अपघाताचे केंद्र बनत आहे. या पुलाच्या लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या असून, पुलाच्या माधोमध खड्डे पडत आहे. त्यामुळे हा पूल अपघाताला आमंत्रण देत आहे़
सुरक्षेच्या कारणास्तव हा मार्ग केव्हाही बंद होवू शकतो अशी, परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबत अधिक माहितीनुसार अंकलेश्वर-बºहाणपूर महामार्गावरील तळोदा ते प्रकाशा दरम्यान पिसावर आणि सद्गव्हाण या ठिकाणी दोन पुल आहेत. या दोन्ही पुलांची दैनावस्था झाली आहे. त्यापैकी सद्गव्हाण येथील पुलावरील लोखंडी सळ्या बाहेर निघाल्या असून, अपघाताला आमंत्रण देत आहेत. एवढेच नव्हे तर ज्या ठिकाणी जॉर्इंट आहे त्याठिकाणी खड्डे पडले आहेत. जशी-जशी अवजड वाहने या मार्गावरून जातात तशी-तशी खड्डे अधिक खोल होत जात आहेत़ लहान वाहनधारक जीव मुठीत घेऊन या पुलावरून प्रवास करीत आहेत. हा पूल केव्हाही कोसळू शकतो.
मिळालेल्या माहितीनुसार, हा पूल गेल्या वर्षीच बांधण्यात आला आहे. तरीही त्याची एका वर्षात ही अवस्था झाल्याचे येथील नागरिकांनी सांगितले. जर हा मार्ग बंद झाला तर गुजरात आणि महाराष्ट्रावरील वाहतूक ठप्प होईल. आणि रहिवाशांना मोठे संकट उभे राहील. हा पूल गुजरात राज्याच्या हद्दीत येतो यासाठी गुजरात विभागाने या पुलाकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुढील उद्भवनारे संकट टाळावे, अशी मागणी गुजरात व महाराष्ट्र बॉर्डर वरील नागरिक करीत आहेत.