ब्राrाणपुरीत वीजेची तार तुटल्याने धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 11:50 IST2019-06-06T11:50:28+5:302019-06-06T11:50:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथील हनुमान मंदिराच्या परिसरातील जीर्ण विद्युत तार रात्री तुटल्याने नागरिकांच्या सतर्कतेमुळे ...

Running away after breaking the wire of electricity in Brahmanpuri | ब्राrाणपुरीत वीजेची तार तुटल्याने धावपळ

ब्राrाणपुरीत वीजेची तार तुटल्याने धावपळ

लोकमत न्यूज नेटवर्क
ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी येथील हनुमान मंदिराच्या परिसरातील जीर्ण विद्युत तार रात्री तुटल्याने नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ होता होता टळला.
याबाबत असे की, ब्राrाणपुरी येथील हनुमान मंदिराच्या मागील वसाहतीतील नागरिक सध्या उकाडा जास्त होत असल्याने रात्रीच्या वेळी बाहेर झोपण्याला पसंती देत आहे. रात्री संपूर्ण गल्लीतील नागरिक बाहेर झोपले असता मंगळवारी अचानक  विद्युत तारा रात्री दोन वाजेच्या सुमारास जोरदार वा:यामुळे ही वीज तार हळू हळू तुटू लागल्याचे अंगणात झोपलेल्या नागरिकांच्या लक्षात आले असता त्यांनी  तात्काळ धाव घेतली. ही तार तुटल्याने  गादीसह एका महिलेची साडी थोडय़ा प्रमाणात जळल्याची                  घटना घडली. जर नागरिकांनी सावधगिरी घेतली नसती तर या ठिकाणी मोठी दुर्देवी घटना घडली असती. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिका:यांनी याकडे            गांभीर्याने लक्ष देवून त्वरित जीर्ण विद्युत तारावर खांब बदलण्याची मागणी होत आहे. तरी संबंधितांनी याकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 

Web Title: Running away after breaking the wire of electricity in Brahmanpuri