एसटीकडून पूरग्रस्तांना दीड लाख रुपयांचे सहाय्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:48 IST2019-08-16T12:48:27+5:302019-08-16T12:48:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना नंदुरबार जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचा:यांनी मदतीचा ...

Rs 1.5 lakh assistance to flood victims from ST | एसटीकडून पूरग्रस्तांना दीड लाख रुपयांचे सहाय्य

एसटीकडून पूरग्रस्तांना दीड लाख रुपयांचे सहाय्य

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांना नंदुरबार जिल्ह्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचा:यांनी मदतीचा हात देत दीड लाख रुपयांची मदत दिली आह़े चालक, वाहक, अधिकारी व तांत्रिक कर्मचा:यांनी संकलित केलेला निधी धुळे विभागीय कार्यालयाकडे सोपवण्यात आला आह़े
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नंदुरबार, नवापुर आणि शहादा आगारातील कर्मचा:यांना एसटी महामंडळाकडून स्वेच्छेने मदत देण्याचे कळवण्यात आले होत़े त्यानुसार नवापुर आगाराने सर्वाधिक मदत जमा करुन देत मदतनिधीत मोलाचा वाटा उचलला आह़े एसटीच्या कर्मचा:यांनी दाखवलेल्या या दातृत्त्वाचे सर्वत्र कौतूक होत आह़े त्यानुसार तीनही आगारातील कर्मचा:यांनी 1 लाख 58 हजार रुपयांचे संलकन केले आह़े शहाद्याचे आगारप्रमुख योगेश लिंगायत यांच्या पुढाकाराने आगारातील 423 कर्मचा:यांनी 21 हजार 450 रुपये संकलित केले होत़े नंदुरबार आगारातील 500 कर्मचा:यांनी आगारप्रमुख मनोज पवार यांच्याकडे 12 हजार रुपये तर नवापुर आगारातील 400 कर्मचा:यांनी आगारप्रमुख राजेंद्र अहिरे यांच्याकडे 1 लाख 25 हजार रुपये जमा केले होत़े संकलित करण्यात आलेली ही रक्कम धुळे विभागीय कार्यालयाच्या सूपूुर्द करण्यात आली आह़े 
तीनही आगारातील चालक-वाहक आणि यांत्रिकी कर्मचा:यांसह तेथील सफाई कर्मचा:यांनीही वेतनातील काही रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निश्चय केला होता़ त्यानुसार त्यांनी रक्कम आगारप्रमुखांकडे दिली होती़ 

याबाबत शहादा आगाराचे व्यवस्थापक योगेश लिंगायत यांनी पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे तेथील सामान्यांचे प्रचंड नुकसान झाले आह़े हे सामान्यच एसटीत प्रवास करुन एसटी महामंडळाच्या यशात भर टाकत असल्याने त्यांचा वाटा त्यांना परत केल्याचे सांगितल़े दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील तीन आगारांनी दिलेल्या योगदानाचे राज्यभरातून कौतूक करण्यात आले आह़े धुळे विभागाच्या प्रमुख मनिषा सपकाळ यांच्याकडून ही रक्कम पूरग्रस्तांसाठी राज्यशासनाने सुरु केलेल्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े 
 

Web Title: Rs 1.5 lakh assistance to flood victims from ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.