शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी ऑफ नंदनगरीतर्फे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

नंदुरबार : येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व बोहरी समाज व वजीही स्काऊट ग्रुपतर्फे कोरोना व ...

नंदुरबार : येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व बोहरी समाज व वजीही स्काऊट ग्रुपतर्फे कोरोना व कोरोना लसीबाबत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

७२ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कोरोनाबाबत जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती रॅलीत रोटरी क्लब ऑफ नंदनगरी व बोहरी समाज वजीही स्काऊट ग्रुपसोबतच स्मित हॉस्पिटल, लायन्स फेमिना क्लब व लायनेस क्लब, रोट्रॅक्ट क्लब ऑफ नंदनगरी, न्यू इंग्लिश स्कूल, उमर्दे खुर्दे यांनी सहभाग घेतला होता. कोरोना व कोरोना लसीबाबत जनजागृतीच्या रॅलीला प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. रॅलीचा शुभारंभ दीनदयाल चौक येथून झाला. तेथून हुतात्मा चौक, अहिल्याबाई विहीर, महात्मा गांधी पुतळा, पंडित जवाहरलाल नेहरू पुतळामार्गे तालुका क्रीडा मैदान येथे राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला. खासदार डॉ. हिना गावित याही या रॅलीला सदिच्छा भेट देत सहभागी झाल्या. कोरोना जनजागृती रॅलीत बोहरी समाजाच्या वजीही स्काऊट ग्रुपचे बँड पथक हे मुख्य आकर्षण होते. या बँड पथकाने नंदुरबारकरांचे लक्ष वेधून घेतले. या वजीही स्काऊट बँड पथकाचे नेतृत्व रोटेरियन फकरुद्दीन जलगुणवाला यांनी केले होते.

या रॅलीदरम्यान कोरोना व कोरोना लसीबाबत विविध जनजागृतीपर फलक लावण्यात आले होते. या रॅलीत न्यू इंग्लिश स्कूल, उमर्दे खुर्दे येथील विद्यार्थ्यांनीदेखील सहभाग घेतला होता. रॅलीत रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर, सचिव मनोज गायकवाड, प्रीतिष बांगड, जितेंद्र सोनार, बोहरी समाजाचे प्रमुख अदनान सफदारी, ॲड. सलीम वोरा, अय्याझ वोरा, फिरदोस लोखंडवाला, लायनेसच्या प्रांतपाल डॉ. तेजल चौधरी, तसनीम जलगुणवाला, लायन्स फेमिना क्लबच्या अध्यक्षा डॉ. गायत्री पाटील, सचिव मीनल म्हसावदकर, दीपा वाडेकर, कांचन मुलानी, शीतल चौधरी, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे फकरुद्दीन जलगुणवाला, आकाश बेदमुथा, दिनेश साळुंखे, इसरार सय्यद, किरण दाभाडे, प्रवीण येवले, फय्याझ खान, इक्बाल शेख, विनोद जैन, अब्बास काटावाला, जुझेर बोहरी, मुर्तुझा वोरा, रोट्रॅक्ट क्लब नंदनगरीचे इंद्रिस वोरा आदी उपस्थित होते. रॅलीदरम्यान शहरातील हुतात्मा स्मारक येथे बालशहीद, राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मारकांना अभिवादन करण्यात आले, तसेच कोरोनाबाबत राज्य शासनाच्या निर्देशांचे पालन करण्यात आले होते.