रोटरी क्लब नंदनगरीतर्फे विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:24 IST2021-01-10T04:24:40+5:302021-01-10T04:24:40+5:30
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे नंदुरबार येथील अलिसा मोहल्ल्यातील मदरसात परिसरातील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. यावेळी असिस्टंट गव्हर्नर ...

रोटरी क्लब नंदनगरीतर्फे विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप
रोटरी क्लब ऑफ नंदनगरीतर्फे नंदुरबार येथील अलिसा मोहल्ल्यातील मदरसात परिसरातील विद्यार्थ्यांना स्वेटर वाटप करण्यात आले. यावेळी असिस्टंट गव्हर्नर अनिश शाह, रोटरी क्लब ऑफ नंदनगरीचे अध्यक्ष नागसेन पेंढारकर, सचिव मनोज गायकवाड, मॉडेल हायस्कूलचे अध्यक्ष पठाण फारूक खान, जमिंअत उल्मा ए हिन्दचे अध्यक्ष मौलाना जकरिया रहमानी, संचालक शेख सईद धोबी, मुख्याध्यापक सय्यद शाहीद अली, रोटरी क्लब नंदनगरीचे जितेंद्र सोनार, अनिल शर्मा, मुर्तूजा वोरा, अब्बास काटावाला, सज्जाद अली सय्यद आदी उपस्थित होते.
या रोटरीतर्फे सामाजिक बांधिलकीतून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. यात आरोग्य शिबिर, गरजूंना मदत करणे अशा विविध प्रकारचे उपक्रम राबविले जातात. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ६० गरजू विद्यार्थ्यांना स्वेटरचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक रोटरी क्लब नंदनगरी लिटरसी चेअरमन इसरार अली सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन शेख अझर धोबी यांनी मानले.