दरोडय़ाचा कट उधळला, नऊ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 12:41 IST2019-08-16T12:41:27+5:302019-08-16T12:41:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या नऊ जणांना वाहनासह ताब्यात घेण्यात तालुका पोलिसांना यश आले. आठ ते ...

Robbery plot overturned, nine arrested | दरोडय़ाचा कट उधळला, नऊ जणांना अटक

दरोडय़ाचा कट उधळला, नऊ जणांना अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या नऊ जणांना वाहनासह ताब्यात घेण्यात तालुका पोलिसांना यश आले. आठ ते नऊ जण तेथून पसार झाले. संशयीत अट्टल असून त्यांचा दरोडय़ाचा कट उधळण्यात आला आहे. 
रमा नामदेव बागुल, मच्छिंद्र जगन हटकर, आत्माराम थोरात, रोहिदास शिवाजी मासुळे, सुरेश जिभाऊ थोरात, भाईदास सरदार खताळ, सिताराम श्रीराम शिंदे, सोपान बापू नरोटे, भाईदास धर्मा पदमोर अशी संशयीतांची नावे आहेत. जिल्ह्यात रात्रीची पेट्रोलींग सक्तीने आणि नियमित करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहेत. त्यानुसार ग्रामिण भागात पेट्रोलिंग करण्यात येत आहे. 13 ऑगस्ट रोजी रात्री तालुका पोलीस ठाण्याचे निरिक्षक व त्यांच्या सोबतचे कर्मचारी नारायण भिल, अनिल सोनवणे, बापू बागुल, मुकेश ठाकरे व राठोड हे पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना संशयीत वाहन वावद ते ढंढाणे दरम्यान जात असल्याची माहिती मिळाली. 
त्यांना  पीकअप वाहन (क्रमांक एमएच 02-एवाय 2170) जातांना दिसले. त्यांनी वाहन थांबवून त्याची तपासणी केली असता त्यात तलवार, कटर, टॉमी, लोखंडी पाने, मिरची पावडर, दोरखंड आदी वस्तू मिळून आल्या. वाहनातील संशयीत भाईदास धर्मा पदमोर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तर इतर आठ जणांना नंतर ताब्यात घेण्यात आले. 
याबाबत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस  अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 
नंदुरबारातही एक ताब्यात
शहरातील बसस्थानक परिसरात संशयास्पद रितीने फिरणा:या एकास 13 रोजी मध्यरात्री अटक करण्यात आली. शंकर शाम ठाकरे रा.माळीवाडा भिलाटी  असे संशयीताचे नाव आहे. मध्यरात्री शंकर ठाकरे हा चोरीच्या इराद्याने बसस्थानक आवारात आढळून आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे     स्क्रू डायव्हर, चाव्यांचा गुच्छ   आढळून आला. पोलीस कर्मचारी राकेश मोरे यांनी फिर्याद दिल्याने संशयीत शंकर ठाकरे विरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार ठाकरे करीत आहे. 
 

Web Title: Robbery plot overturned, nine arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.