अभियंत्याच्या बॅगेतून रिव्हॉल्व्हर लंपास

By Admin | Updated: February 10, 2017 00:12 IST2017-02-10T00:12:55+5:302017-02-10T00:12:55+5:30

नंदुरबार : जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता के.एस.बांगर यांच्या बॅगेतून चोरटय़ांनी रिव्हॉल्व्हर चोरून नेली.

Revolver lamps from the engineer's bag | अभियंत्याच्या बॅगेतून रिव्हॉल्व्हर लंपास

अभियंत्याच्या बॅगेतून रिव्हॉल्व्हर लंपास

नंदुरबार : जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता के.एस.बांगर यांच्या बॅगेतून चोरटय़ांनी रिव्हॉल्व्हर चोरून नेली. बुधवारी नाशिक ते नंदुरबार एस.टी. प्रवासात ही घटना घडली. शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तथा सारंगखेडा बॅरेजला नियुक्तीस असलेले कोंडीबा सांडू बांगर हे नाशिक-नंदुरबार एस.टी.बसने बुधवारी सायंकाळी नंदुरबारकडे येण्यास निघाले. सायंकाळी उशिरा नंदुरबारात आल्यावर त्यांनी त्यांची बॅग तपासली असता त्यातील  रिव्हॉल्वर व काडतुसे कुणीतरी चोरून नेल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी शहर पोलिसात  धाव घेतली.
बॅगेत कपडे, कागदपत्रे आणि सहा बोअरची रिव्हाल्वर आणि सहा काडतुसे होती. त्यापैकी रिव्हॉल्वर व काडतुसे लंपास झाली.

 

Web Title: Revolver lamps from the engineer's bag