परतीच्या पावसाचा कालावधी वाढतोय

By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: July 22, 2018 01:20 PM2018-07-22T13:20:54+5:302018-07-22T13:23:22+5:30

पर्यावरणातील बदल : 2010 ते 2017 र्पयतचा ‘रेन विड्रोलेशन पिरियड’

The return period of the return period is increasing | परतीच्या पावसाचा कालावधी वाढतोय

परतीच्या पावसाचा कालावधी वाढतोय

Next
ठळक मुद्देएकदाही परतीच्या पावसाला सुरुवात ही 1 सप्टेंबर पासून झालेली नाही़  पश्चिम राजस्थानातून परतीचा पाऊस सुरूपावसाचे दिवस हे साधारणत 70

संतोष सूर्यवंशी । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गेल्या आठ वर्षापासून परतीच्या पावसाची वाटचाल चिंताजनक होत असल्याचे दिसून येत आह़े वर्षागणिक परतीच्या पावसाचा कालावधी वाढत असून ऋतुमधील ही असमानता पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरू पाहत आह़े यंदाही महाराष्ट्रातील परतीच्या पावसाला ऑक्टोबर महिन्यातील शेवटचा आठवडा उजाडणार असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात येत आह़े 
2010 पासून ते 2017 र्पयतचा ‘रेन विड्रोलेशन पिरियड’ पाहिला असता, 2010 साली 27 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती़ महाराष्ट्रातून परतीच्या पावसाला सुरुवात 10 ऑक्टोबरपासून होत साधारणत: 20 ऑक्टोबर्पयत महाराष्ट्रातून परतीच्या  पावसाचा कालावधी पूर्णत्वास आला होता़ 
2011 मध्ये 23 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती़ त्या वर्षी साधारणत: तीन आठवडे उशिराने परतीच्या पावसाला सुरुवात झालेली होती़ त्यानंतर 30 सप्टेंबर र्पयत महाराष्ट्रातून परतीचा पाऊस सुरू झाला होता़ परंतु त्यात कमी दाबाचा पट्टा व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्री वादळामुळे या ठिकाणी ‘ब्रेक डाऊन’ निर्माण झाला होता़ परिणामी महाराष्ट्रातून परतीचा पाऊस जाण्यास 25 ऑक्टोबर उजाडला होता़
2012 मध्ये पश्चिम राजस्थानातून 24 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली होती़ त्यानंतर साधातरण 27 सप्टेंबरपासून दक्षिण गुजरात व कच्छ येथून परतीचा पाऊस सुरू झाला होता़ त्यानंतर साधारणत: 30 ऑक्टोबर मध्ये महाराष्ट्रातून परतीचा पाऊस सुरू झाला होता़ 
2013 मध्ये 9 ऑक्टोबरपासून पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसाने सुरुवात केली होती़ तसेच 17 ऑक्टोबरपासून महाराष्ट्र सीमा हद्दीतून परतीचा पाऊस सुरू होत 20 ऑक्टोबर्पयत तो पूर्णपणे परतला होता़ 
2014 मध्ये 23 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतीचा पाऊस सुरू झाला होता़ त्यानंतर 5 ऑक्टोबरपासून महाराष्ट्राच्या हद्दीतून परतीचा पाऊस सुरू होऊन 17 ऑक्टोबर्पयत महाराष्ट्रातून पूर्णपणे परतीचा पाऊस निघून गेला़ 
2015 मध्ये 4 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसाने सुरुवात केली होती़ 6 ऑक्टोबरपासून त्याने महाराष्ट्रातून परतीला सुरुवात करून 18 ऑक्टोबर्पयत तो पूर्णपणे परतला होता़  
2016 साली परतीच्या पावसाला पुन्हा विलंबाने सुरुवात झाली होती़ 15 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून परतीचा पाऊस सुरू झाला होता़ तब्बल एक महिन्याने म्हणजे 14 ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाने महाराष्ट्र हद्दीतून सुरुवात करुन 18 ऑक्टोबर्पयत तो पूर्णपणे परतला होता़ 
2017 साली पश्चिम राजस्थानातून परतीच्या पावसाने तब्बल 27 सप्टेंबरपासून सुरुवात केली होती़ 15 ऑक्टोबरपासून त्याने महाराष्ट्राच्या हद्दीतून परतण्यास सुरुवात करून 25 ऑक्टोबर्पयत तो पूर्णपणे महाराष्ट्राच्या हद्दीतून परतला होता़ पावसाचा सामान्य कालावधी जून ते सप्टेंबर इतका असतो़ त्यातील पावसाचे दिवस हे साधारणत 70 इतके समजण्यात येत असतात़ 1 सप्टेंबरपासून पावसाच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होत असत़े परंतु पर्यावरणाचे बिघडते चक्र म्हणून की काय, गेल्या आठ वर्षांपासून एकदाही परतीच्या पावसाला सुरुवात ही 1 सप्टेंबर पासून झालेली नाही़ 

साधारणत 1 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला पश्चिम राजस्थानातून सुरुवात होत असत़े परंतु गेल्या काही वर्षापासून परतीचा पाऊस सप्टेंबरच्या शेवटापासून सुरु होत आह़े परतीच्या पावसाचा वाढता कालावधी चिंतेचा विषय आह़े
    डॉ़ शुभांगी भुते,
    शास्त्रज्ञ, कुलाबा वेधशाळा़

Web Title: The return period of the return period is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.