शहरं
Join us  
Trending Stories
1
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
2
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
5
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
6
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
7
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
8
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
9
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
10
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
11
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
12
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
13
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
14
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
15
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
16
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
17
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
19
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
20
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त

१४ भागात राहणार प्रतिबंधात्मक क्षेत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील १४ भाग हे प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. कोरोना संसर्गित रुग्ण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील १४ भाग हे प्रतिबंधक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. कोरोना संसर्गित रुग्ण आढळून आलेला व त्याच्या अवतीभोवतीचा हा परिसर आहे. या भागात वेळोवेळी निर्जंतूकीकरण केले जात आहे. बाहेरील व्यक्तीला येण्यास किंवा येथील व्यक्तीस बाहेर जाण्यास मंगळवार सकाळपर्यंत प्रतिबंध राहणार आहे. हा संपुर्ण भागा आधीच सील करण्यात आला आहे. सोमवारनंतर या भागात संपुर्ण लॉकडाऊन वाढविण्याचे ठरविल्यास जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासंदर्भात विचार करण्यात येणार आहे. दरम्यान, रविवारी देखील संपुर्ण शहरात शुकशुकाट कायम होता.नंदुरबारात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर प्रशासनाने अत्यंत कडक भुमिका घेत उपाययोजना केल्या आहेत. या विषाणूचा संसर्ग इतरत्र होऊ नये. संसर्गीत व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींनी शहरात इतरत्र फिरू नये यासाठीन शनिवार ते सोमवार रात्रीपर्यंत संपुर्ण शहर लॉकडाऊन करण्यात आले आहे. १४ भाग पुर्णत: प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत. तेथे उपाययोजनांना गती देण्यात आली आहे.थर्मल स्कॅनरद्वारे तपासणीप्रतिबंधात्मक क्षेत्रात कोणालाही ये-जा करता येणार नाही. सर्व प्रकारच्या वाहनांना या क्षेत्रात प्रतिबंध असेल. अत्यावश्यक सेवा सुरळीत राहण्यास मुभा राहील. अशी सेवा पुरविणाऱ्यांची तपासणी करणे बंधनकारक राहील. अत्यावश्यक सेवेसाठी संबंधितांना सुरक्षा पास उपलब्ध करून देण्यात येतील. प्रतिबंधीत क्षेत्रात येण्याजाण्याच्या ठिकाणी उष्म चाचणी करणे आवश्यक राहील. आरोग्य सेवकांनी ये-जा करणाºया सर्वांची छाननी करावी.प्रतिबंधात्मक क्षेत्रातून बाहेर जाणाºया अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींची नोंद घेण्यात येईल. भौगोलीक विलगीकरण क्षेत्रात जाणाºया व्यक्तींना औषधांचा डोस देण्यात येईल. या क्षेत्रातून बाहेर जाणाºया वाहनांचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहील. अत्यावश्यक सेवेचा पुरवठा करताना सोशल डिस्टन्सिंग करणे आवश्यक राहील. आदेशाचा भंग केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.निर्जंतुकीकरणावर भरप्रतिबंधीत क्षेत्र व बफर झोनमध्ये निर्जंतुकीकरणावर भर दिला जात आहे. शनिवार रात्रीपासून रविवार सायंकाळपर्यंत एकुण पाच वेळा या भागात जंतूनाशक अर्थात सोडियम हायपोक्लोराईड सोल्यूशनची फवारणी करण्यात आली आहे. कुणालाही घराबाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.याशिवाय बफर झोनमध्ये देखील वेळोवेळी फवारणी केली जात आहे. संपुर्ण शहरात देखीेल पाच ट्रॅक्टरद्वारे फवारणी केली जात आहे. जसे ट्रॅक्टर उपलब्ध होतील तसे ते आणखी वाढविण्यात येणार असल्याचे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.पोलिसांनाही सोयया भागात बंदोबस्तासाठी असलेले पोलीस, आरोग्य कर्मचारी यांना सुरक्षात्मक दृष्टया आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. पोलिसांची सॅनिटाझर व्हॅन देखील वेळोवेळी या भागात येवून तैणात पोलीस कर्मचारी, आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना सॅनिटाईज करून घेतले जात आहे.प्रत्येकाला मास्क देखील पुरविण्यात आले आहेत. बंदोबस्तासह पोलीस पेट्रोलिंग वाहने देखील नियमित फिरत आहेत.

शहरातील भाग क्रमांक १० येथील एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी भाग क्रमांक १० मधील पुढील भाग हे प्रतिबंधीत क्षेत्र घोषीत केले आहेत. यात हाट दरवाजा, गुजर गल्ली, कुंभारवाडा, दवे इंजिनिअर परिसर येथून बालाजी वाडा परिसर, मण्यार मोहल्ला, खिलाफत चौक, सुतार मोहल्ला, घोडापीर मोहल्ला, इलाही चौक, बागुल राईस मिल परिसर, अलीसाहब मोहल्ला, कसाई मोहल्ला, करिम मंजील आणि दखणी गल्ली हे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.प्रतिबंधीत क्षेत्रात संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जात आहे. कुणालाही बाहेर निघण्यास परवाणगी नाही. दूध, भाजीपाला, किराणा विक्रीही बंद आहे. सोमवारनंतर या भागात शिथीलता दिली जाते किंवा कसे याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत.

प्रतिबंधीत क्षेत्राच्या उत्तरेकडील मेवालाल सेठ यांचे वखार पासून दक्षिणेस मुख्य रस्त्याचे जेपीएन हॉस्पीटल, जुने कोर्ट ते मंगळबाजार, मराठा व्यायामशाळा, सिद्धीविनायक चौक ते शिवाजी रोडपर्यंत भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यासोबत पुर्वेकडील बंधारहट्टी भिलाटी, गुरव गल्ली, योगेश्वरी माता मंदीर, स्वामी विवेकानंद हायस्कुल, धानोरा नाका, पाताळगंगा नदी पावेतो. रज्जाक पार्क, लहान माळीवाडा भिलाटी, दक्षिणेकडील रज्जाक पार्क, बिफ मार्केट, मेहतर वस्ती, गोंधळी गल्ली, भरवाड वस्ती, मरीमाता मंदीर, दालमिल परिसर, पटेल छात्रालय ते संत रोहिदास चौक ते हाट दरवाजा, तेथून पाण्याची टाकी, नुतन शाळा, मेवालाल सेठ यांची वखार आणि पश्चिमेकडील बंधरहट्टी भिलाटी. न.पा.शाळा, काळी मस्जीद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय, मटन मार्केट, जळका बाजार, दोषाह तकीया, दादा गणपतीपर्यंतचे क्षेत्रदेखील बफर झोन म्हणून जाहीर केले आहे.