‘रेस्क्यू’ ऑपरेशन करणा:या वनकर्मचा:यावर माकडाचा हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:05 IST2019-11-23T13:05:23+5:302019-11-23T13:05:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पिसाळलेल्या माकडाने केलेल्या हल्ल्यात वनरक्षक जखमी झाल्याची घटना नंदुरबारात घडली़ शुक्रवारी डुबकेश्वर महादेव मंदिर ...

‘रेस्क्यू’ ऑपरेशन करणा:या वनकर्मचा:यावर माकडाचा हल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पिसाळलेल्या माकडाने केलेल्या हल्ल्यात वनरक्षक जखमी झाल्याची घटना नंदुरबारात घडली़ शुक्रवारी डुबकेश्वर महादेव मंदिर परिसरातून माकडास पकडून वन कर्मचारी वनक्षेत्रात सोडत असताना पिंज:यातून बाहेर पडलेल्या माकडाने कर्मचा:याला चावा घेत हल्ला केला़
अरविंद निकम असे जखमी वनरक्षकाचे नाव असून ते चाकळे ता़ नंदुरबार येथे नियुक्त आहेत़ शुक्रवारी होळ तर्फे हवेली शिवारातील डुबकेश्वर महादेव मंदिर परिसरात माकड पिसाळल्याने मंदिरात दर्शनासाठी येणा:यांवर हल्ला केल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती़ त्यानुसार सहायक वनसंरक्षक जी़आऱरणदिवे यांच्या मार्गदर्शनात वन कर्मचा:यांच्या पथकाने याठिकाणी शुक्रवारी सकाळी भेट देत छोटा पिंजरा लावून सुमारे चार तासांच्या मेहनतीनंतर माकडाला ताब्यात घेतले होत़े वनरक्षकांचे पथक त्यास नंदुरबार तालुक्यातील वनक्षेत्रात सोडण्यासाठी जात असताना अचानक माकड पिसाळून बाहेर आल़े यावेळी वनरक्षक अरविंद निकम यांनी त्याच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, यात त्यांच्या हात आणि पायाला चावा घेत अंगावर नखांनी हल्ला करत जखमी केल़े जखमी झाल्यानंतरही त्यांनी माकडाला पकडून पिंज:यात टाकल़़े काही वेळाने कर्मचा:यांनी माकडाला पिंज:याबाहेर काढून वनक्षेत्रात सोडले परंतू माकड पुन्हा पिंज:यात जाऊन बसले होत़े सायंकाळी उशिरा त्याला पुन्हा वनक्षेत्रात सोडून देण्यात आल़े दरम्यान घटनेत जखमी झालेले वनरक्षक निकम यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत़
पिसाळलेल्या माकडाला बेशुद्ध करुन पकडण्यासाठी वनविभागाने पशुवैद्यकीय विभागाला कळवले होत़े परंतू त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारे प्रतिसाद न दिल्याने वनकर्मचा:यांनी धोका पत्करुन त्याला पकडल़े वनविभागाच्या कर्मचा:यावर प्राण्याने हल्ला करण्याची ही चौथी घटना आह़े जखमी कर्मचा:यांना शासनाकडून मदत देण्याची अपेक्षा व्यक्त होत आह़े