अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात शवविच्छेदनाअभावी मृतदेहांची हेळसांड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 13:04 IST2018-05-08T13:04:34+5:302018-05-08T13:04:34+5:30
जि.प.स्थायी समिती सभेत नाराजी : दुर्गम भागातील आरोग्य केंद्रांमध्ये सोयच नाही

अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात शवविच्छेदनाअभावी मृतदेहांची हेळसांड
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 8 : धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाची सोय नसल्यामुळे दुर्गम भागात मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागते. ग्रामिण रुग्णालयील डॉक्टरही हद्दीच्या वादातून शवविच्छेदन करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभेत करण्यात आला. दरम्यान, नवीन आरोग्य केंद्र बांधतांना शवविच्छेदन गृहाची सोय करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य अधिका:यांनी दिली.
जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा अध्यक्षा रजनी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. उपाध्यक्ष सुहास नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, विषय समिती सभापतींसह सदस्य उपस्थित होते. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
दुर्गम भागात विशेषत: धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अर्थात दोन्ही तालुक्यातील 26 आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदनगृहाची सोय नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांना शवविच्छेदनासाठी धडगाव, मोलगी किंवा अक्कलकुवा येथे जावे लागते. तेथील ग्रामिण रुग्णालयांमध्ये पुन्हा हद्दीचा वाद निर्माण होतो. याबाबत सदस्य रतन पाडवी यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यांनी सांगितले, खटासखाई येथील खुनाच्या घटनेतील मृतदेह आरोग्य केंद्राअंतर्गत असल्याचे सांगून मोलगी ग्रामिण रुग्णालयात पडून होते. अशाच प्रकारचा अनुभव अनेकवेळा आलेला आहे. त्यामुळे मृतदेहाची हेळसांड होत असते. याबाबत आरोग्य विभागाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी त्यांनी केली. जिल्हा आरोग्य अधिका:यांनी जुन्या आरोग्य केंद्रातील इमारतींमध्ये शवविच्छेदनगृह बांधण्यात आलेली नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी शवविच्छेदन होऊ शकत नाही. आता नव्याने ज्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यात येत आहे त्या ठिकाणी शवविच्छेदनगृह बांधले जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ती सोय होऊ शकणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी स्पॉट पीएम करण्यास सांगितल्यास आरोग्य केंद्राचे डॉक्टर तेथे जावून पीएम करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे यांनी आपण जिल्हा शल्य चिकित्सकांशी याबाबत बोलून हद्दीचा वाद न घालता ग्रामिण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन करण्याबाबत सुचना देण्यासंदर्भात सांगणार असल्याचे स्पष्ट केले.
दोन्ही तालुक्यातील 26 आरोग्य केंद्रांमध्ये 52 रिक्त पदे भरण्यात आली असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
बचत गटांचा निधी
दुर्गम भागातील बचत गटांना पैसे निधी देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बागुल यांनी निधी बालविकास प्रकल्प अधिका:यांकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले. सीईओंनी बचत गटांचे कॅशबूक व बँक खातेपासबूकची नोंदी तपासाव्या अशा सुचना दिल्या.
पदाधिकारी निवासस्थान
पदाधिका:यांच्या निवासस्थान भागात पथदिवे नसल्यामुळे अडचणी निर्माण होत असल्याचा मुद्दा सुहास नाईक यांनी उपस्थित केला. निवासस्थानांचा भाग निजर्न असल्यामुळे सरपटणा:या प्राण्यांमुळे धोका निर्माण होऊ शकतो असे सांगितले. त्यामुळे तातडीने पथदिवे बसविण्याबाबत सुचना देण्यात आल्या.
पदाधिका:यांना नवीन वाहन
जिल्हा परिषद अध्यक्षांसाठी नवीन वाहन खरेदी करण्यास मंजुरी देण्यात आली. साधारणत: 12 लाख रुपये किंमतीचे नवीन वाहन राहणार आहे. लवकरच ते सेवेत दाखल होईल. याशिवाय पदाधिका:यांसाठी देखील नवीन वाहने खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली असून लवकरच त्या देखील खरेदी केल्या जाणार असल्याचे सभेत सांगण्यात आले.