Vidhan Sabha 2019 : भाजपातील बंडखोरीबाबत प्रदेशकडे अहवाल सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 12:36 IST2019-10-11T12:35:38+5:302019-10-11T12:36:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुव्यातील बंडखोर उमेदवाराविषयीचा अहवाल राज्य कमिटीकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच त्याबाबत कार्यवाही करण्यात येणार ...

Vidhan Sabha 2019 : भाजपातील बंडखोरीबाबत प्रदेशकडे अहवाल सादर
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्कलकुव्यातील बंडखोर उमेदवाराविषयीचा अहवाल राज्य कमिटीकडे पाठविण्यात आला आहे. लवकरच त्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणुकीसंदर्भातील माहिती देण्यासाठी विजय चौधरी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार उपस्थित होते. अक्कलकुवा येथे भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. याबाबत विचारले असता चौधरी यांनी सांगितले, जिल्ह्यात युती अबाधीत आहे. दोन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सोबतीने काम करीत आहेत. बंडखोरांवर कारवाई होणारच. त्यासाठीचा अहवाल प्रदेश कमिटीकडे पाठविण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यावेळी राज्य सरकारने गेल्या पाच वर्षात राबविण्यात आलेल्या विविध योजना, विकास कामांची माहिती त्यांनी दिली.