बायपासवरील खड्ड्याची दुरुस्ती करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:23 IST2021-01-13T05:23:37+5:302021-01-13T05:23:37+5:30
नंदुरबार: शहरातील बायपास रोडवर धुळे चौपुलीजवळील रस्त्याला खड्डे पडल्यामुळे शहराच्या रस्त्यावरील वाहने अचानक खड्डात पडत असल्याने, अपघातांना सामोरे जावे ...

बायपासवरील खड्ड्याची दुरुस्ती करा
नंदुरबार: शहरातील बायपास रोडवर धुळे चौपुलीजवळील रस्त्याला खड्डे पडल्यामुळे शहराच्या रस्त्यावरील वाहने अचानक खड्डात पडत असल्याने, अपघातांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या मध्यभागी असलेला खड्डा दिवसेदिवस मोठा होत असून, संबंधित प्रशासन मोठ्या अपघाताची पाहत आहे का? असा प्रश्न वाहनधारकांमध्ये निर्माण झाला आहे.
मंगळबाजारात विना मास्कवर कार्यवाहीची मागणी
नंदुरबार: शहरातील मंगळबाजारात भाजीपाला घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, बाजारात ग्राहक व विक्रेता विना मास्क फिरत असून, प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचे उल्लघंन होत असून, संबंधितांनी विनामास्क फिरणाऱ्यावर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
अवकाळी पावसाने ऊसतोडणीवर परीणाम
शहादा: अवकाळी पावसाने उसतोडणीवर परीणाम झाला असून, उसाच्या शेतात ट्रॅक, ट्रॅक्टरची चाके रूतून जात असल्याने शेतातून वाहन काढणे, जिकिरीचे जात आहे. त्यामुळे मजुरांना उसाच्या मुळ्या डोक्यावर उचलून शेताबाहेर आणून ट्रॅक्टर, ट्रॅकला सीडी लावून ऊस वाहनामध्ये भरला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह ऊसतोड कामगांराना तारेवरची कसरत करावी लागत आहे.