वनहक्कधारकांना नवनिर्मितीचा ध्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:14 IST2019-11-05T13:13:34+5:302019-11-05T13:14:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी विकास विभागामार्फत सामुहिक वनहक्क देण्यात आलेल्या 27 गावांमधील वनक्षेत्राच्या विकासासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात ...

वनहक्कधारकांना नवनिर्मितीचा ध्यास
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आदिवासी विकास विभागामार्फत सामुहिक वनहक्क देण्यात आलेल्या 27 गावांमधील वनक्षेत्राच्या विकासासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठी कृती आराखडय़ाच्या कामाला सुरुवात झाली असून हे प्रकल्प सामुहिक वनहक्कधारकांसाठी नवपर्वणी ठरणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील 27 गावांमधील नागरिकांना आदिवासी विकास विभागामार्फत सामूहिक वनहक्क क्षेत्रांच्या विकासासाठी पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी संवर्धन व व्यवस्थापन कृती आराखडा तयार करण्याच्या पहिल्या टप्प्यातील कामाला सुरुवात झाली आहे . पहिल्या टप्प्यात तळोदा तालुक्यातील मालदा व धडगाव तालुक्यातील लेगापाणी, सिंदीदिगर मुरुमपाडा व तोरणमाळ येथे सुक्ष्म नियोजन पद्धतीने कृती आराखडा तयार करण्यात येत आहे.
वनहक्क क्षेत्राच्या संवर्धनासाठी सर्व गावांमध्ये वन व्यवस्थापन समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. लोकसमन्वय प्रतिष्ठाण या संस्थेच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सहभागातून या समित्यांमार्फत कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. रांजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा कॅनव्हर्जन समितीने पुढाकार घेतला असून वन विभागाचे देखील सहकार्य लाभत आहे. दि.2 नोव्हेंबरपासून या प्रक्रियेला सुरुवात झाली असून प्रथम पाच गावांमध्ये ही प्रक्रिया राबविली जात आहे. डिसेंबर अखेर्पयत सर्व 27 गावांमधे कृती आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक गावातील तीन शेतक:यांसाठी अभ्यास दौरे देखील अयोजित करण्यात आले आहेत.
लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे यांनी या प्रक्रियेचे महत्व पटवून दिले. त्यात सामूहिक वन हक्क हे आदिवासींच्या विकासातील एक नवपर्वणी ठरणार आहे. या नवनिर्मितीतूनच आदिवासी विकासाचा नवा इतिहास देखील घडणार असल्याचे सांगितले. वनहक्क क्षेत्राच्या संवर्धनासाठी तयार होणा:या कृती आराखडय़ाची पूर्णत: अंमलबजावणी करण्याचे अधिकार ग्रामस्थ व वन व्यवस्थापन समितीला असल्याने पटवून देत शिंदे यांनी पर्यावरण संवर्धनासह ग्रामस्थांना रोजगार व उद्योगाची संधीही मिळणार असल्याचे सांगितले. त्या-त्या परिसरातील जंगलात वनसंवर्धनाच्या कामासह व्यवसायही उपलब्ध होणार आहे. ज्यातून स्थलांतर व कुपोषणासारख्या समस्यांवर मात करता येईल.
जिल्हाधिकारी भारुड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा उपवनसंरक्षक सुरेश केवटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन व वनविभाग या कार्यात सहभागी झाले आहे. ही प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण व्हावी म्हणून धडगावचे गणेश पराडके, तोरणमाळचे जीवन, मालद्याचे गोपी पावरा व दिगंबर नाईक, लोकसमन्वय प्रतिष्ठानचे संजय महाजन, मुकेश वळवी, नारायण वळवी, निशांत मगरे, दिलवर पाडवी, अशोक पाडवी, देवीसिंग वसावे यांच्यासह तळोदा येथील महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे 30 विद्यार्थी परिश्रम घेत आहेत
अक्कलकुवा- सरी, भराडीपादर, कुंडी, दहेल, खाई, वालंबा, गुलीआंबा, राजकुंड, भगदरी
धडगाव- तोरणमाळ, निगदी, कुंभरी, सिंदीदगर, लेगापाणी, बुरुमपाडा, बिजरी
तळोदा- इच्छागव्हाण, गोरामाळ, वाल्हेरी, मालदा, पिंपरपाडा, अमोनी
नंदुरबार- ठाणेपाडा, अजे2पूर, सुतारे, अंबापूर वाघाळे