शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण संख्येत वाढ नसल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 12:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहरातील कंटेनमेंट झोन वगळता बफर झोनमधील व्यावसायिक प्रतिष्ठाने दररोज सकाळी आठ ते बारा वाजेदरम्यान ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहरातील कंटेनमेंट झोन वगळता बफर झोनमधील व्यावसायिक प्रतिष्ठाने दररोज सकाळी आठ ते बारा वाजेदरम्यान सुरू राहणार असून १७ मे पर्यंत सशर्त परवानगी असणार आहे. गेल्या आठवडाभरात शहरात कोरोना विषाणू संक्रमीत रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही. १२८ अहवालांपैकी १०८ अहवाल निगेटीव्ह आले असून ११ अहवालांची प्रतीक्षा आहे. रूग्ण संख्येत वाढ झालेली नाही हे शहरासाठी दिलासादायक संकेत असल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरासे यांनी दिली.शहादा शहरातील नगरपालिका हद्दीत एकूण नऊ जणांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्याअनुषंगाने शहादा शहरातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभाग क्र.१, २, ३, ४, ७, ८, ९ मधील परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ३ मे रोजी निर्गमित केलेल्या आदेशान्वये १७ मे पर्यंत नागरिकांच्या सोयीसाठी स्थानिक प्रशासनाच्या वतीने पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले आहे. प्रतिबंधात्मक क्षेत्र वगळून असलेल्या बफर झोन जसे आंबेडकर चौक ते दोंडाईचा रोड परिसर, वृंदावन नगर, मातोश्री नगर, साईबाबा नगर, संभाजी नगर, दिनदयाल नगर, राम नगर, विजय नगर, श्रमिक नगर, भवानी नगर, भाजीपीर, आझाद चौक परिसर, मुरली मनोहर कॉलनी, समता नगरमधील अत्यावश्यक वस्तू विक्रेते जसे किराणा दुकान, मेडीकल, दूध, कृषी संलग्न व्यवसाय सकाळी आठ ते १२ या वेळेत सुरु राहतील. तथापि, मेनरोडवरील फक्त किराणा दुकान तसेच मेडीकल दुकाने निर्धारित वेळेकरीता सुरु राहतील. शहरी भागात जेथे फक्त एकच दुकान आहे जसे कॉलनी शॉप, रेसींडेंशीयल कॉम्पलेक्समधील दुकान सुरु राहतील. पंरतु एका लेनमध्ये पाचपेक्षा अधिक दुकाने असल्यास फक्त अत्यावश्यक वस्तू विक्रेते यांची दुकाने सुरु राहतील. जसे पुरुषोत्तम मार्केट, ५६ गाळे मार्केट, खरेदी-विक्री मार्केटमधील व्यापारी गाळ्यात फक्त अत्यावश्यक वस्तू विक्रेते यांची दुकाने निर्धारित वेळेत सुरु राहतील. इतर दुकाने जसे मोबाईल शॉप, हार्डवेअर आदी बंद राहतील.शहरातील सर्व पान व तंबाखू दुकाने पूर्णपणे बंद राहतील. तसेच सार्वजनिक ठिकाणी दारु, पान, तंबाखू खाणे यावर बंदी असेल व सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हा दंडनीय अपराध मानण्यात येईल. किरकोळ भाजीपाला विक्री प्रेस मारुती ग्राऊंड तसेच डोंगरगाव रस्त्यालगतच्या बसस्थानकाच्या खुल्या जागेत ६ मे पासून सकाळी आठ ते १२ या वेळेत सुरू होईल याची सर्व किरकोळ भाजीपाला विक्रेते व नागरिकांनी नोंद घ्यावी. भाजीपाला आडत दुकाने सुरु करण्याबाबत नंतर निर्णय घेण्यात येणार आहे. बफर झोनमध्ये हार्डवेअर दुकाने, मोबाईल शॉप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, इतर आस्थापना, बिल्डिंग मटेरियल दुकाने सकाळी आठ ते १२ वाजेपर्यंत चालू असतील.सोशल डिस्टन्सिंग व मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. तसेच वरील सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा भारतीय दंडविधान कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांनी दिला आहे. शहरातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस विभागातर्फे सक्त कारवाई केली जात आहे. बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याने शहरातील गर्दीचे प्रमाण काहीअंशी कमी झाले आहे.जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना विषाणू संक्रमित रुग्ण शहादा येथे नऊ असून पैकी एकाचा मृत्यू झाला आहे. शहरात कंटेनमेंट व बफर झोनमधील नागरिकांची वैद्यकीय तपासणी ३० पथकांमार्फत करण्यात येत आहे. २८ एप्रिलनंतर शहरात नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. आजअखेर एकूण ११ अहवालांची प्रतीक्षा आहे.