नंदुरबार जिल्ह्यात १,२६३ पाणी साठ्यांचे पुनरुज्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 12:55 PM2020-08-11T12:55:11+5:302020-08-11T12:55:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय हरीत लवादाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १,२६३ पाणी साठ्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून ८६ कामे ...

Rehabilitation of 1,263 water reservoirs in the district | नंदुरबार जिल्ह्यात १,२६३ पाणी साठ्यांचे पुनरुज्जीवन

नंदुरबार जिल्ह्यात १,२६३ पाणी साठ्यांचे पुनरुज्जीवन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : राष्ट्रीय हरीत लवादाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात १,२६३ पाणी साठ्यांचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून ८६ कामे प्रस्तावीत करण्यात आली आहेत. प्रत्येक गावात किमान एक पाणीसाठा पुनरुज्जीवनाचे काम झाले पाहिजे अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
नवे जलस्त्रोत विकसीत करण्यात व त्याद्वारे पाणीसाठा करण्यात येणाºया अडचणी लक्षात घेता अस्तित्वात असलेल्या पाणीसाठ्याचे पुनरुज्जीवन करून पाणीसाठ्याची क्षमता वाढविण्याचे निर्देश राष्ट्रीय हरीत लवादाने दिले होते. त्यानुसार जिल्ह्यात पुनरुज्जीवन झालेल्या कामांची माहिती संकलीत करण्यात आली व काही नवी कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
कृषी विभागातर्फे १,०३२ कामे करण्यात आली आहेत. जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागातर्फे २२१ कामे करण्यात आली असून ७७ कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत.
नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागातर्फे सहा कामे करण्यात आली असून नऊ नवीन कामे प्रस्तावित करण्यात आली आहे, तर मृद व जलसंधारण विभागातर्फे चार कामे पूर्ण करण्यात आली आहेत.
प्रत्येक गावात किमान पाणीसाठा पुनरुज्जीवनाचे एक काम करण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहे. पुनरुज्जीवन कामामुळे पाणीसाठ्यात वाढ होऊन त्याचा लाभ ग्रामीण जनतेला होणार आहे.

Web Title: Rehabilitation of 1,263 water reservoirs in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.