शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

सत्यमनगरासह परिसरात अंधाराचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:32 IST

नंदुरबार : शहरालगतच्या सत्यमनगर वसाहतीत पथदिवे बसविण्यात येत नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात काही ठिकाणी पथदिवे बसविले ...

नंदुरबार : शहरालगतच्या सत्यमनगर वसाहतीत पथदिवे बसविण्यात येत नसल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरात काही ठिकाणी पथदिवे बसविले आहेत. मात्र, मुख्य रस्त्यांवर व वसाहतीतील काही भागांत पथदिवे बसविले नसल्याने अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे संबंधित ग्रामपंचायतीने याकडे लक्ष देऊन त्वरित पथदिवे बसवावेत, अशी मागणी रहिवाशांकडून होत आहे.

रस्त्यावरील वाळू ठरतेय अपघातास कारणीभूत

नंदुरबार : तळोदा रोडवरून साक्री रस्त्याकडे जाणाऱ्या वाळूच्या वाहनातून पडणारे पाणी आणि वाळू नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. रस्त्यावर वाळू पडून राहत असल्याने, अनेक वाहनधारक घसरून गंभीर इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

महिलांमध्ये भीतीचे वातावरण

नंदुरबार : शहरातील विविध मार्गांवर मनोरुग्ण विचित्र अवस्थेत फिरताना दिसून येतात. रात्री अचानक ते समोर येत असल्याने, नागरिकांमध्ये विशेषत: लहान बालके व स्त्रियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे या मनोरुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतर्फे करण्यात येत आहे, तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज आहे.