अमिष देऊन युवतीवर बलात्कार : पिडित युवती धडगाव तालुक्यातील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 11:57 IST2018-02-28T11:57:35+5:302018-02-28T11:57:35+5:30

Rape victim raped by Amish: The victim's wife, in Dhadgaon taluka | अमिष देऊन युवतीवर बलात्कार : पिडित युवती धडगाव तालुक्यातील

अमिष देऊन युवतीवर बलात्कार : पिडित युवती धडगाव तालुक्यातील


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : खरवड ता़ धडगाव येथील 24 वर्षीय युवतीवर युवकाने लगआचे अमिष दाखवत बलात्कार केला़ 19 ते 24 फेब्रुवारीदरम्यान हा प्रकार घडला़ युवतीने पोलीसात फिर्याद दिली आह़े
खरवड (देवपाडा) येथील 24 वर्षीय युवतीला किरण मोचडा पावरा रा़ भोगवाडे ता़ धडगाव याने लगआचे अमिष दाखवून 19 रोजी पळवून नेले होत़े तिला बिजरी ता़ धडगाव येथून तळोदा, नंदुरबार मार्गाने लोणी जि़ अहमदनगर येथे घेऊन गेला होता़ याठिकाणी किरण याने युवतीवर वेळावेळी बलात्कार केला़ यादरम्यान त्याने पिडितेचा जीवे ठार मारण्याची धमकीही दिली होती़ या प्रकाराला कंटाळून 24 फेब्रुवारी रोजी पिडित युवतीने स्वत:ची सुटका करून घेत, नंदुरबार व तेथून खरवड येथील घर गाठले होत़े घरी गेल्यानंतर तिने संपूर्ण प्रकार आईवडीलांसमोर कथन केला होता़
या प्रकरणी पिडित युवतीने धडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून किरण पावरा याच्याविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक भामरे करत आहेत़

Web Title: Rape victim raped by Amish: The victim's wife, in Dhadgaon taluka