राजमोही येथे गळा दाबून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 12:51 IST2017-10-29T12:51:19+5:302017-10-29T12:51:19+5:30

पतीविरुद्ध गुन्हा : महिलेच्या माहेरी घडला प्रकार

Rajamohi throated blood thrown here | राजमोही येथे गळा दाबून खून

राजमोही येथे गळा दाबून खून

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : घरगुती वादातून पतीने प}ीचा गळा आवळून खून केल्याची घटना मोठी राजविहीर, ता.अक्कलकुवा येथे 26 रोजी रात्री घडली. प}ी माहेरी आली असता तेथे हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
फुलवंतीबाई युवराज वसावे (20) रा.मेवास अंकुशविहिर असे मयत महिलेचे नाव आहे. पोलीस सूत्रांनुसार, युवराज ओजना वसावे हा मेवास अंकुशविहिर येथे आपली पत्नी फुलवंतीबाई युवराज वसावे यांच्यासह राहत होता. प}ी माहेरी राजमोही, ता.अक्कलकुवा येथे आली होती. तिला घेण्यासाठी युवराज ओजना वसावे हा गेला. रात्री पती-प}ींमध्ये काहीतरी वाद झाला. त्या वादातूनच युवराज याने प}ी फुलवंतीबाई हीचा गळा आवळून खून केला. सकाळी ही बाब लक्षात आल्यावर राजमोही येथे एकच खळबळ उडाली. 
विनोद रायसिंग वळवी यांनी तातडीने अक्कलकुवा पोलिसांना याबाबत माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी गावीत, पोलीस निरिक्षकांसह घटनास्थळी भेट दिली. 
याबाबत विनोद रायसिंग वळवी यांनी फिर्याद दिल्याने युवराज वसावे याच्याविरुद्ध अक्कलकुवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.    
 

Web Title: Rajamohi throated blood thrown here