पावसाने झोडपले, पीक उत्पादनाने मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:12 IST2019-11-07T12:11:39+5:302019-11-07T12:12:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीपेक्षा 19.41 टक्के अधीक तर पावसाळ्यानंतरही अर्थात ऑक्टोबरअखेर एकुण 138.3 ...

पावसाने झोडपले, पीक उत्पादनाने मारले
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यंदा पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीपेक्षा 19.41 टक्के अधीक तर पावसाळ्यानंतरही अर्थात ऑक्टोबरअखेर एकुण 138.3 टक्के पाऊस झाला आहे. येत्या दोन दिवसात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यंदाच्या पावसामुळे सर्वच लघु व मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. गेल्या 40 वर्षात कधीही 100 टक्के न भरलेले प्रकल्प देखील यंदा पुर्णपणे भरून त्यांच्यातून पाण्याचा विसर्ग करावा लागला. दरम्यान, अतीपावसामुळे जिल्ह्यातील 50 टक्केपेक्षा अधीक क्षेत्रावरील खरीप पीक वाया गेले आहे.
यंदा पावसाळ्याची सुरुवात निराशाजनक झाली होती. जून महिन्यात त्या महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत केवळ 45 टक्के पाऊस झाला होता. परिणामी पेरण्या लांबल्या होत्या. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात ब:यापैकी पाऊस झाल्याने पेरण्या उरकल्या. परंतु याच महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून पावसाने तुफान बॅटींग करण्यास सुरुवात केली ती सप्टेंबर महिन्याच्या अखेर्पयत कायम राहिली. पावसाळ्याचे चार महिने अर्थात सप्टेंबर महिना उलटला तरी पाऊस थांबण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. गेल्याच आठवडय़ात परतीच्या पावसाने दाणादान उडविली असतांना आता चक्री वादळामुळे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यामुळे नागरिकांच्या मनात पुन्हा भितीचे काहूर उठले आहे.
22 वर्षात प्रथमच सरासरी पार
जिल्ह्यात पावसाने प्रथमच सरासरी पार केली आहे. 22 वर्षापूर्वी जिल्ह्यात 104 टक्के पावसाची नोंद करण्यात आली होती. ऑक्टोबर अखेर एकुण 138.3 टक्के पाऊस नोंदला गेला आहे. त्यानंतर 100 टक्केच्या आतच पाऊस राहिला आहे. यंदा ऑगस्ट महिन्यातच सरासरीपेक्षा अधीक पाऊस नोंदला गेला आहे.
गेल्यावर्षी तर अवघा 68 टक्के पाऊस झाल्याने दुष्काळाचे चटके जिल्हावासीयांना सहन करावे लागले होते. यंदा सर्वाधिक पाऊस नवापूर तालुक्यात नोंदला गेला आहे. त्या खालोखाल नंदुरबार, तळोदा, शहादा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात पावसाची नोंद करण्यात आली आहे.
खरीप गेले वाया
अती पावसामुळे खरीप पीक वाया गेले आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यार्पयत पीक परिस्थिती उत्तम होती. यंदा पीक उत्पादनाचेही रेकॉर्ड मोडले जाईल अशी अपेक्षा शेतक:यांना होती. परंतु पीक परिपक्व होऊनही सततच्या पावसामुळे ते काढता येत नव्हते. शेतात मळणी व इतर कामे करता येत नव्हती. त्याचा परिणाम शेतातच पीक वाया गेले.
मका, बाजरी यांच्या कनसांना कोंब फुटले, सोयाबीन सडले. कापूस वाया गेला तर इतर तृणधान्य व कडधान्याचे उत्पादन निम्म्यावर आले. त्यामुळे जास्त पाऊस होऊनही शेतक:यांना त्याचा फायदा होऊ शकला नसल्याची स्थिती आहे.
पाणी टंचाई मात्र दूर
जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्याचा पूर्व भाग, शहादा तालुक्याचा काही भाग तसेच दुर्गम भागात नेहमीच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असते. गेल्यावर्षी तर पुर्ण जिल्हाभरातच पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. पाण्यासाठी दाहिदिशा फिरण्याची वेळ आली होती. परंतु यंदा सरासरीच्या तुलनेत 40 टक्के जास्त पाऊस झाल्याने, सर्व नदी, नाले दुथडी भरून वाहत असल्याने आणि सर्वच लघु व मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत.
याशिवाय विहिरी, कुपनलिका देखील तुडूंब भरल्या आहेत. त्यामुळे पाण्याची टंचाई यंदा राहणार नाही. त्यामुळे दुष्काळापासून जनतेची यंदा मुक्तता आहे.
यंदा पाऊस चांगला झाल्याने रब्बीची आशा शेतक:यांना लागून आहे. नदी, नाले अद्यापही प्रवाही आहेत. सर्वच प्रकल्प तुडूंब भरले आहेत. विहिरी, कुपनलिका देखील भरलेल्या आहेत. त्यामुळे रब्बीचे पीक तरी चांगले येईल या आशेवर शेतकरी आहेत.
4पिण्याच्या पाण्याची समस्या देखील यंदा मिटणार आहे. नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्प तुडूंब भरला आहे. शहादा व तळोद्याची तापीवरील पाणी पुरवठा योजनेलाही संजिवनी मिळणार आहे. गावोगावच्या पाणी योजना देखील यंदा वर्षभर सुस्थितीत चालणार असल्याचे संकेत आहेत.