शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 12:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने शेतक:यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात शुक्रवारी रात्री सर्वत्र कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने शेतक:यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान पिकांच्या वाढीसाठी व दुबार पेरणी टाळण्यासाठी अजून पावसाची आवश्यकता आहे.शहादाशहाद्यात शुक्रवारी रात्री 10 वाजता पावसाला सुरुवात झाली. तासभर चाललेल्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मोठय़ा प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावल्याचे दिसून येत आहे. दीड महिन्यांपासून दडी मारलेल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांना जीवदान मिळाले असले तरी अजूनही शहादेकरांना जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. यंदा अजूनही नद्या, नाल्यांना पूर आला नसल्याने पाणीटंचाईची टांगती तलवार कायम असल्याचे चित्र आहे.हळदाणीनवापूर तालुक्यातील हळदाणीसह मासलीपाडा परिसरात शुक्रवारी पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना त्याचा फायदा होणार आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजाने विजांच्या गडगडाटासह आलेल्या एक तास चाललेल्या पावसामुळे समाधान व्यक्त केले. मात्र काही परिसरात तुरळक पाऊस झाल्याचे दिसून येत आहे. परंतु परिसरातील नदी नाल्यांना अद्यापर्पयत पूर आला नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.नवापूरनवापूर तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री व शनिवारी दुपारी झालेल्या पावसाने दुबार पेरणीचे संकट टळले असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आजही जटील राहीला आहे. या पावसामुळे सोयाबीन, उडीद, मका व ज्वारी यासह खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. 

रांझणी परिसरात पावसाची हुलकावणीरांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणीसह परिसरात जोरदार पावसाची प्रतीक्षा असून, पावसाचे वातावरण तयार होऊनही पाऊस बरसत नसल्याने शेतक:यांची निराशा होत आहे. शक्रवारी रात्री जोदार वा:यासह विजांचा कडकडाट परिसरात होत होता. परंतु प्रत्यक्षात पावसाला सुरुवात झाली नाही. शनिवारी दिवसर चांगले तापमान होते. मात्र वारा बंद झाल्याने एकदाची पावसाला कधी सुरुवात होते याकडे सर्वाचे लक्ष लागून होते. परंतु प्रत्यक्षात पाच ते दहा मिनिट पावसाच्या बारीक सरी पडल्याने या परिसरात पुन्हा पावसाने हुलकावणी दिल्याने शेतक:यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान कापूस, ज्वारीसह मका व सोयाबीन सारख्या पिकांसाठी पाऊस अत्यावश्यक आहे.