महिला महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:51 IST2019-08-14T12:51:42+5:302019-08-14T12:51:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ट्रायबल महिला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे ...

महिला महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ट्रायबल महिला महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित रॅगिंग प्रतिबंध समुपदेशन कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ.एन.डी. चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.डी.एस. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.एस.बी. पाटील, प्रा.डी.व्ही. वाघ उपस्थित होते.
या वेळी डॉ.चौधरी यांनी सांगितले की, रॅगिंग कायद्याने गुन्हा आहे. म्हणून आपण महिलासंबंधी विविध कायदे आहेत. त्या कायद्यांची माहिती करून घ्या. या कायद्यांची माहिती आपणास असेल तर आपल्यावर कोणीही अन्याय, अत्याचा करणार नाही त्यामुळे कायद्याची माहिती करून घ्या, असे आवाहन विद्यार्थिनींना केले. प्रा.डी.व्ही. वाघ, प्रा.डॉ.एस.बी. पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.सुनील पानपाटील तर आभार प्रा.बी.एफ. चव्हाण यांनी मानले. कार्यशाळेसाठी प्रा.डॉ.मधुकर देसले, डॉ.सुनील कुवर, प्रा.मिना हजारी, प्रा.व्ही.डी. चव्हाण, रवी परदेशी यांनी परिश्रम घेतले.