सततच्या पावसामुळे रब्बी पेरणीला ‘ब्रेक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:56 IST2019-11-06T12:56:25+5:302019-11-06T12:56:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सोमावल : तळोदा तालुक्यातील पश्चिमेकडील सातपुडय़ाच्या पायथ्यालगत असलेल्या भागात यंदा परतीचा पाऊस लांबल्याने रब्बी पिकांच्या पेरणीला ...

Rabi sowing 'break' due to continuous rains | सततच्या पावसामुळे रब्बी पेरणीला ‘ब्रेक’

सततच्या पावसामुळे रब्बी पेरणीला ‘ब्रेक’

लोकमत न्यूज नेटवर्क
सोमावल : तळोदा तालुक्यातील पश्चिमेकडील सातपुडय़ाच्या पायथ्यालगत असलेल्या भागात यंदा परतीचा पाऊस लांबल्याने रब्बी पिकांच्या पेरणीला उशिरा सुरुवात झाली.  दरम्यान, खरीप हंगामातील पिके वाया गेल्याने अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. आता शेतक:यांना रब्बी हंगामातील उत्पन्नाबाबत आशा लागून आहे.
सोमावल परिसरात शेतकरी  रब्बी हंगामात दादरची मोठय़ा प्रमाणात पेरणी करतात. दादरच्या गावराणी वाणासह हुरडय़ासाठी, लाह्यांसाठी, पापड बनविण्यासाठी लागणा:या वाणासह सुधारित व संकरित वाणाची पेरणी करतात. या भागात उत्पन्न होणा:या दादरला गुजरात राज्यात मोठी मागणी असते.  मात्र दिवसेंदिवस दादरच्या क्षेत्रात घट होत असल्याचे दिसते. तळोदा तालुक्यातील पश्चिमेकडील भागात गावरान दादरचे वाणही लुप्त  होण्याच्या मार्गावर आहे. यंदा  परतीचा पाऊस लांबल्याने एकीकडे खरीप पिकांची दैना झाल्याने   ओला दुष्काळ सदृश्य स्थिती   निर्माण झाली आहे. परिणामी खरीप हंगामात मोठी घट आल्याने शेतकरी आता रब्बीच्या तयारीला लागला आहे. 
दादर पिकाच्या पेरणीसाठी 15 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबरचा कालावधी चांगला असतो. परंतु परतीचा पाऊस लांबल्याने पेरणीसाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ाची वाट पहावी लागली. पावसामुळे जमिनीच्या मशागतीची कामे वेळेवर न झाल्याने रब्बीची पेरणी रखडली आहे. दरम्यान, रब्बी हंगामातील पिकांबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळण्याची अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त होत आहे.
 

Web Title: Rabi sowing 'break' due to continuous rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.