शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोकं आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
4
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
5
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
7
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
8
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
9
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
10
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
11
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
12
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
13
शाहीद-करीना नाही तर 'या' जोडीला ऑफर झाला होता 'जब वी मेट', इम्तियाज अलीचा खुलासा
14
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
15
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
16
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
17
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  
18
शरद पवारांनी दिलेला 'तो' प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला होता; संजय निरुपमांचा दावा
19
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार का? संजय राऊतांचा सवाल
20
ना विराट, ना रोहित! पॅट कमिन्सचा आवडता भारतीय खेळाडू कोण? त्याचं धक्कादायक उत्तर

मोलगीत समृद्धीसाठी राणी दिवाळीला साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 1:00 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ऐतिहासिक परंपरा असलेली गावदिवाळीचा उत्सव मोलगी ता.अक्कलकुवा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ऐतिहासिक परंपरा असलेली गावदिवाळीचा उत्सव मोलगी ता.अक्कलकुवा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आपली संस्कृती जपवुन ठेवण्यासाठी व पुढच्या पिढीतदेखील आपल्या संस्कृतीचे बीज पेरण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. गावात सुख-समृद्धी नांदावी यासाठी मोलगी येथील गावकऱ्यांनी निसर्ग देवतेला साकडे घातले.आदिवासी बांधवांचे सण हे आदिवासी संस्कृतीप्रमाणेच वेगळे असून मानवाला निसर्गाकडे घेऊन जाणारे आहेत. पहिल्या सारखे आदिवासी आता विखुरलेल्या स्थितीत राहिलेला नाहीत. त्यांनी आता आपले स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहेत. विविध स्तरावर नानाविध भूमिका बजावत आहेत. परंतु आजच्या आधुनिक युगातदेखील आपली हजारो वर्षांची परंपरा, रूढी, संस्कृती जपून त्यानुसार अजूनही सण, उत्सव साजरे केले जात आहेत, तसे मोलगी येथेही साजरी होत आहे. गावदिवाळी हा अशाच एका उत्सवाचा भाग आहे. काळात आयोजित केला जात असतो. मौखिक मान्यतेनुसार धातुयुगाच्या पूर्वीपासून गाव दिवाळी साजरी केली जात आहे. पूजा करण्यासाठी व नवस फेडण्यासाठी पीठ व तेलाची मागणी करून गावभर फिरल्यावर देवस्थानाच्या ठिकाणी पूजा केली जात असते. भागतद्वारे नवस फेडून सुख शांती मागितली जाते. गावातील लोकांचे पीकपाणी चांगले राहू दे, पाऊस चांगला पडू दे अशा पद्धतीने मागणी मागितले जाते. गाव दिवाळीचा सण गावात मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. हजारो वर्षांची परंपरा जपून ठेवल्याबद्दल गावकऱ्यांमध्येही रास्त अभिमान आहे.राणी दिवाळीचा जन्म डाब राजमंडल म्हणजेच दाब या गावी झाला. गांडा ठाकूर या राजाची बायको असलेली दिवाळी ही पोरोब देवाची मुलगी असून आईचे नाव आठा डुंगर असल्याचे म्हटले जात आहे. राणी दिवाळीबाबत अशी मान्यता आहे की, आदिवासी समाज हा पूर्वी जंगलात राहून उपजीविका करीत असे त्यांना वाघ, सिह, अस्वल या जनावरांपासून मोठ्या प्रमाणात त्रास होत असे हे राणी दिवाळीला समजले असावे असा अंदाज काही पूर्वजांचा आहे. तेव्हापासून या पशूंना आनंदी ठेण्यासाठी राणी दिवाळीने हातात झाडू घेऊन ताटात एक सोन्याचा दिवा, बाली, पायात घुंगरू बांधून नाचू लागली. तेव्हापासून या आदिवासी बांधवाना जंगली जनावरांचा त्रास कमी होऊ लागला तेव्हापासून ते आतापर्यंत राणी दिवाळीचे अनुकरण समाजबांधव करीत आहे.