सार्वजनिक जागांचे दोन वेळा निर्जंतुकीकरण करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 11:44 IST2020-03-30T11:43:52+5:302020-03-30T11:44:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरी व ग्रामिण भागातील संस्थामध्ये निर्जतुंकीकरण करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य ...

Public spaces should be sterilized twice | सार्वजनिक जागांचे दोन वेळा निर्जंतुकीकरण करावे

सार्वजनिक जागांचे दोन वेळा निर्जंतुकीकरण करावे

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरी व ग्रामिण भागातील संस्थामध्ये निर्जतुंकीकरण करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत.
याअंतर्गत नागरी भागातील ट्रॅव्हल्स बसेस, रेल्वे स्टेशन, बस स्टॅन्ड, खाजगी दवाखाने, सार्वजनिक उद्याने, सार्वजनिक बेंचेस, तसेच ग्रामिण भागातील ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, शासकीय दवाखाने, पोस्ट आॅफीस, सर्व शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक वाचनालये आदी कार्यालय, सार्वजनिक स्थळे व शासकीय वाहने एकत्रितरित्या निर्जतुकीकरण केले जात आहेत.
कार्यालय व सार्वजनिक स्थळे दिवसातुन किमान दोन वेळेस फवारणी करण्यात यावी. संपूर्ण गावातील घरांची व जनावरांच्या गोठयाची फवारणी करावयाची असल्यास दररोज किमान एक वेळेस फवारणी करण्यात यावी.
कार्यालयातील टेबल, खुर्च्या, ग्रिल, दरवाजे व इतर स्पर्श होणाऱ्या वस्तुंचे मॅपींग या द्राव्याने दिवसातून दर तीन तासाने करण्यात यावे.
सर्व कार्यालयाच्या बाहेर हात धुण्याकरीता पाणी व साबण किंवा हॅन्ड वॉशची निरंतर व्यवस्था करण्यात यावी. ज्या व्यक्तींना घरात विलगीकरण केलेले आहे. अशा व्यक्तीने वापरलेले ताट, वापरलेले कप, जेवणाची भांडी, टॉवेल, पांघरुन, गादी आणि इतर दैनंदिन वापरातील घरगुती वस्तु घरातील इतर व्यक्तींना वापरण्यात देण्यात देवू नये.
असे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

Web Title: Public spaces should be sterilized twice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.