जातिय सलोखा रॅलीव्दारे अक्कलकुव्यात जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 11:57 IST2017-08-20T11:57:46+5:302017-08-20T11:57:55+5:30

 Public awareness in the Akalakuta by the National Secular Rally | जातिय सलोखा रॅलीव्दारे अक्कलकुव्यात जनजागृती

जातिय सलोखा रॅलीव्दारे अक्कलकुव्यात जनजागृती


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अक्ककुवा येथील जमीअत उलेमा ऐ हिंद यांच्याकडून जातीय सलोखा कायम राखण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होत़े 
रॅलीची सुरुवात ङोंडा चौक येथून करण्यात आली़येथून निघून शहरातील प्रमुख मार्गावरुन रॅली निघाली़ यानंतर जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला़ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फारुख मदनी हे होत़े सोबत शिवसेना जिल्हाप्रमुख आमश्या पाडवी, पंचायत समितीचे उपसभापती इंद्रपालसिंग राणा, भाजपचे माजी जिल्हाअध्यक्ष नागेश पाडवी, विश्वासराव मराठे, जमीअत उलेमाचे तालुका अध्यक्ष जकरीया अब्दुल समद मक्राणी, जिल्हा सचिव जुबेर मोहम्मद मक्राणी, इमरान पठाण, साजीद मक्राणी, मोहम्मद हनीफ बनोच, राजेंद्र लोहार, शिवसेना तालुका प्रमुख जयप्रकाश परदेशी, उपतालुका प्रमुख तुकाराम वळवी, किशोर ठाकूर, चंद्रकांत चव्हाण आदी उपस्थित होत़ेया वेळी जातिय सलोखा राखण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मान्यवरांनी सांगितल़े 

Web Title:  Public awareness in the Akalakuta by the National Secular Rally