शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
3
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
4
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
5
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
6
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
9
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
10
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
11
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
12
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
13
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
14
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
15
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
16
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
17
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
18
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
19
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
20
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

वन आणि कृषी विभागामार्फत नागरिकांना रोजगार द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2020 12:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात विविध विभागाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर विशेष भर देण्यात यावा़ यात वन आणि कृषी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात विविध विभागाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर विशेष भर देण्यात यावा़ यात वन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न करावे, असे आदेश पालकमंत्री अ‍ॅड़ के. सी. पाडवी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.बैठकीस आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पांडा, तृप्ती धोडमिसे, अपर जिल्हाधिकारी महेश पाटील उपस्थित होते.बैठकीत अ‍ॅड़ पाडवी यांनी मनरेगांतर्गत ग्राम रोजगार सेवकांना नवे जॉबकार्ड तयार करण्यासाठी प्रोत्साहन शेत बांधावर फळझाडे लागवडीच्या लाभाची माहिती द्यावी. चारोळी, महूची लागवड करून त्याच्या व्यावसायिक उपयोगाबाबत विचार होवून त्यासाठी आवश्यक यंत्रणा उभारण्याबाबत आराखडा तयार करावा. आमचूर उत्पादनासाठी उपयुक्त आंब्याच्या जातींची लागवड करावी व कृषी विभागाने अशा जातींच्या नर्सरी तयार कराव्या. औद्योगिक विकास महामंडळ वसाहतीतील उद्योगात असलेल्या संधीची माहिती युवकांना द्यावी. जिल्ह्यात अधिकाधिक वन धन केंद्र सुरू करण्यासाठी नियोजन करावे तसेच सामाजिक वनीकरण विभागाने रोपवाटिकांची संख्या वाढवावी असे आदेश दिले़ प्रकल्प कार्यालयाने शासन निर्णयानुसार शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांची नोंदणी करावी, त्यासाठी न्यूक्लिअस बजेटमधून खर्च करावा़ गेले दोन महिने बाहेरगावी असलेल्या मजुरांना त्या महिन्याचे धान्य मिळवून देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल. पावसाळयात दुर्गम भागात अन्नधान्य वेळेत पोहोचेल याकडे लक्ष देण्याच्या सूचनाही पालकमंत्री अ‍ॅड़ के़सी़ पाडवी यांनी बैठकीत केल्या़बैठकीत पूरहानी कार्यक्रमात रस्ते दुुरुस्ती आणि बँकांकडून पीककर्ज देण्याबाबत चर्चा करण्यात येऊन सूचना देण्यात आल्या़ जिल्ह्याने कोरोना प्रतिबंधाच्या उपाययोजना योग्यप्रकारे राबविल्या आहेत. परराज्यातील मजुरांना पाठविण्याबाबत जिल्ह्याच्या कामगिरीचे राज्यस्तरावर कौतुक झाले आहे. येत्या काळातही संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेण्याची गरज असून जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात यावा. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली असली तरी लागू असलेल्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी, बाहेरुन येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचनाही अ‍ॅड़ पाडवी यांनी बैठकीत केल्या़ जिल्ह्यात कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळेबाबत पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले़ जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी जिल्ह्यातून परराज्यातील २६ हजार १०९ मजूरांना तर राज्यात इतर भागातील १ हजार ६७५ नागरिकांना बसेसद्वारे सोडण्यात आले. ८६ हजार नागरिकांनी आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. जिल्ह्यात १६ प्रतिबंधीत क्षेत्रात १० हजार ८४६ कुटुंबातील ५० हजारावर नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. पोलीस विभागाने संचारबंदी कालावधीत २ हजार ८२३ वाहनांवर कारवाई करुन ३७ लाख रुपये दंड वसूल केला आहे. शिधापत्रिकाधारकांना पुरवठा विभागाने ९६ टक्के धान्य वाटप केल्याची माहिती दिली़जिल्ह्यात अमृत आहार योजनेंतर्गत २१ हजार स्तनदा व गरोदर मातांना तर १ लाख १३ हजार बालकांना लाभ देण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली़