नंदुरबार - येथील युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मोर्चाला जिल्हाभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यावर आत जाऊ देन्याच्या मागणीवरून काही युवकांनी परिसरातील वाहने फोडली. जमावाला पांगवण्यासाठी पोलीसांना अश्रू धुरचा नळकांड्या फोडव्या लागल्या.
नंदुरबारातील जय वळवी या युवकाच्या खुनातील आरोपीना कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी व निषेध म्हणून बुधवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात हजारो नागरिक सहभागी झाले होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला असता काही जणांनी आत जाऊ देण्याचा आग्रह धरला त्यावरून पोलीस व मोर्चेकरी यांच्यात वाद झाल्याने काही जणांनी परिसरातील वाहने तोडफोड केली. जमावला पांगवण्यासाठी अश्रू धुराच्या नलकांडया फोडाव्या लागल्या. शहरात तणावपूर्ण शांतता आहे.