शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्प अधिकाऱ्यांनीच विद्यार्थ्यांना दिले बीजगणिताचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सात-आठ महिन्यांपासून सर्व शाळा-महाविद्यालये बंद होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळून शाळा-महाविद्यालये ...

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील सात-आठ महिन्यांपासून सर्व शाळा-महाविद्यालये बंद होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना पाळून शाळा-महाविद्यालये सुरू करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे. आदिवासी विकास विभागानेही आश्रमशाळा सुरू केल्या असून विद्यार्थ्यांच्या निवासाचे व वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्हान आश्रमशाळा प्रशासनापुढे आहे. या पार्श्वभूमीवर तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा हे अक्कलकुवा तालुक्यातील डाब येथे गेले असता त्यांनी येथील शासकीय आश्रमशाळेला भेट दिली.

या भेटीदरम्यान त्यांनी शाळेत केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेत शाळेत सध्या असलेली अध्ययन-अध्यापनाच्या प्रक्रियेची माहिती जाणून घेतली. वर्गात जाऊन शिक्षक शिकवत आहेत किंवा नाही याबाबत सविस्तर माहिती घेतली व अभ्यासक्रम वेळेत कसा पूर्ण करता येईल. त्याबाबत तत्काळ नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. एवढ्यावरच न थांबता प्रकल्प अधिकारी पंडा यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना स्वतः बिजगणित विषयाचे २० मिनिट अध्यापन केले. काही उदाहरणे शिक्षकांकडून सोडवून घेतले. काही समीकरणे विद्यार्थ्यांना सोडविण्यासाठी दिली.

प्रकल्प अधिकाऱ्यांनी अनपेक्षितपणे हातात पुस्तक व खडू घेत शिक्षकाची भूमिका घेत विद्यार्थ्यांना अध्यापन केल्याने अनेकांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला. या वेळी सहायक प्रकल्प अधिकारी अमोल मेटकर, शिक्षण विस्तार अधिकारी जी.डी. अखडमल, बबन मुंगळे, डाब शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक के.सी. कोकणी आदींसह आश्रमशाळेचे शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

प्रकल्प अधिकारी अविशांत पंडा यांनी सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवत विद्यार्थ्यांना बिजगणित विषय शिकवला. सोप्या भाषेत त्यांनी विद्यार्थ्यांना समीकरणे सोडवून दाखविले. स्वतः प्रकल्प अधिकारीच शिकवत असल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्साह व चेहऱ्यावर आनंद दिसून आला. शाळेत असताना कोणत्याही प्रकारची अडचण किंवा समस्या निर्माण झाल्यास प्रकल्प कार्यलयाशी संपर्क साधून त्या तत्काळ सोडवाव्यात व अध्ययन-अध्यापन प्रक्रिया कोणत्याही कारणाने खंडित होऊ देऊ नका, असे त्यांनी याप्रसंगी विद्यार्थी व आश्रमशाळा प्रशासनाला सांगितले.