रुपे कार्डची सक्ती शेतक-यांना अडचणीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 12:59 IST2018-05-09T12:59:06+5:302018-05-09T12:59:06+5:30
खरीप पीककर्ज : 28 कोटींचे कर्ज वाटप, अनेक शेतकरी अद्यापही प्रतीक्षेत

रुपे कार्डची सक्ती शेतक-यांना अडचणीची
लोकमत ऑनलाईन
नंदुरबार, दि़ 9 : पीक कर्ज घेणा:या शेतक:यांना जिल्हा बँकेतर्फे रुपे कार्ड वापरण्याची सक्ती करण्यात येत असल्यामुळे शेतक:यांमध्ये नाराजी आहे. पूर्वीप्रमाणेच खात्यावर पीक कर्जाची रक्कम जमा करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतार्पयत जिल्हा बँकेकडून 10 कोटी तर राष्ट्रीयकृत बँकेकडून 18 कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे. मे अखेर उद्दीष्टपूर्ती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
खरीप पीक कर्जासाठी शेतक:यांनी मार्च, एप्रिल महिन्यातच बँकांकडे अर्ज केले होते. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज मर्यादा पत्रके मंजूर करून त्यानुसार कर्ज वितरणास सुरुवातदेखील केली आहे. यंदा मात्र, जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज खाते वेगळे ठेवले असून त्यातील रक्कम रुपे कार्डद्वारेच काढता येईल किंवा त्यानुसार व्यवहार करता येतील असा फतवा काढलेला असल्यामुळे शेतक:यांमध्ये नाराजी आहे.
16 हजार शेतक:यांची मागणी
यंदा खरीप हंगामासाठी जिल्ह्यात 108 सहकारी संस्थामार्फत 16,148 सभासदांना 65,626 हेक्टर क्षेत्रासाठी 10,816 लाख रुपये रकमेचे मंजुरी पत्रके तयार करून बँकेकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी 108 सहकारी संस्थामार्फत 16, 148 सभासदांना 65,626 हेक्टर क्षेत्रासाठी 10,816 लाख रुपये रकमेचे कर्ज मागणी अर्ज मंजूर करण्यात आले आहे.
तालुकानिहाय नियोजनानुसार, नंदुरबार तालुक्यात 54 संस्थांच्या माध्यमातून सात हजार 282 सभासदांना त्यांच्या 37,590 हेक्टर क्षेत्रासाठी 4,960 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. नवापूर तालुक्यातील 10 संस्थांच्या 1,650 सभासदांच्या 6,250 हेक्टरसाठी 1,120 लाख रुपये रक्कम तर शहादा तालुक्यातील 44 संस्थांच्या 7,216 सभासदांना 18,816 हेक्टर क्षेत्रासाठी 4,736 लाख रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे.
28 कोटींचे कर्ज वाटप
विविध बँकांतर्फे आतार्पयत एकुण 28 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक एस.वाय.पुरी यांनी दिली. धुळे-नंदुरबार जिल्हा बँकेतर्फे 10 कोटी रुपये तर राष्ट्रीय कृत बँकाकडून 18 कोटी असे एकूण 28 कोटी रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. येत्या आठवडय़ात त्यात आणखी वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले.
पूर्वीप्रमाणेच ठेवावे
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्ज देताना पूर्वीचीच पद्धत ठेवावी अशी मागणी करण्यात येत आहे. पूर्वी पीक कर्ज शेतक:यांच्या नियमित खात्यावर जमा केले जात होते. त्यातून शेतक:याला एकाच वेळी चेकद्वारे ती रक्कम काढता येत होती. आता रुपे कार्डद्वारे ती काढावी लागणार आहे. त्यालाही मर्यादा राहणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच शेतक:यांच्या बँक खात्यावर पीक कर्जाची रक्कम जमा करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.
शेतकरी अडचणीत
पीक कर्जाची रक्कम रुपे कार्डद्वारेच काढता येणार असल्याच्या सक्तीमुळे शेतक:यांच्या अडचणीत वाढच होणार आहे. विविध बँकाच्या नियमानुसार एका वेळी ठरावीक रक्कमच काढता येणार असल्यामुळे मोठी अडचण होणार आहे. शिवाय जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम नसल्यामुळे दुस:या एटीएममध्ये अतिरिक्त शुल्कदेखील शेतक:यांना द्यावे लागणार आहे. सर्वच शेतक:यांना कार्डद्वारे रक्कम काढता येते असे नाही. त्यामुळेदेखील समस्या वाढणारच आहे. कॅशलेश आणि एटीएमद्वारेच व्यवहार करण्यावर शासनाचा भर असला तरी काही बाबतीत त्यात शिथिलता असली पाहिजे अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
वेळेत साध्य व्हावे
पीक कर्जाचे उद्दीष्ट वेळेत साध्य व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काही राष्ट्रीयकृत बँका पीक कर्जासाठी शेतक:यांचे अडवणुकीचे धोरण राबवीत आहेत. त्यामुळे शेतक:यांमध्ये नाराजी आहे. दरवर्षी राष्ट्रीयकृत बँक शाखांना दिलेल्या उद्दीष्टापेक्षा 70 ते 75 टक्केच उद्दीष्ट साध्य करीत असतात. याउलट जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे उद्दीष्ट साध्य होत असते. बँकर्सच्या बैठकीत याबाबत जिल्हाधिका:यांनी सक्त सुचना दिलेल्या होत्या. याशिवाय वेळेत कर्ज वितरण होणेदेखील गरजेचे आहे. खरीप नियोजन आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी 15 मे र्पयत कर्ज मागणी केलेल्या सर्वच शेतक:यांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत.