Nandurbar: शहादानजीक खासगी प्रवासी बस उलटली, १५ प्रवासी जखमी
By मनोज शेलार | Updated: April 12, 2023 18:56 IST2023-04-12T18:56:01+5:302023-04-12T18:56:16+5:30
Nandurbar: खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस शहादानजीक उलटल्याने झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे शहादानजीक घडली. जखमी झालेले सर्व प्रवासी हे मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत.

Nandurbar: शहादानजीक खासगी प्रवासी बस उलटली, १५ प्रवासी जखमी
- मनोज शेलार
नंदुरबार : खासगी प्रवासी वाहतूक करणारी बस शहादानजीक उलटल्याने झालेल्या अपघातात १५ प्रवासी जखमी झाल्याची घटना बुधवारी पहाटे शहादानजीक घडली. जखमी झालेले सर्व प्रवासी हे मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत.
सुरत येथून मध्यप्रदेशातील खरगोन येथे खासगी प्रवासी बस जात होती. शहादानजीक आल्यावर वीज उपकेंद्रानजीक चालकाचा ताबा सुटल्याने बस दुभाजकावर आदळली. त्यानंतर रस्त्याच्या बाजूला उलटली. बसमध्ये एकूण ४० प्रवासी होते. त्यापैकी १५ प्रवाशांना जबर मार लागल्याने त्यांना शहादा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर प्रवाशांना किरकोळ मार लागल्याने त्यांना दुसऱ्या एका बसने खरगोनकडे रवाना करण्यात आले. शहादा पोलिसात बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर चालक पसार झाला.