शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून उसाला एकरकमी 2308 रुपये भाव जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:07 IST

नंदुरबार : आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून यंदा एका हप्त्यात दोन हजार 308 रुपये प्रतीटन उसाला भाव देण्यात येणार असल्याचे ...

नंदुरबार : आदिवासी सहकारी साखर कारखान्याकडून यंदा एका हप्त्यात दोन हजार 308 रुपये प्रतीटन उसाला भाव देण्यात येणार असल्याचे  चेअरमन शिरीष नाईक यांनी गाळप हंगामाच्या शुभारंभप्रसंगी जाहीर केले. डोकारे साखर कारखान्याचा गळीत हंगाम व गव्हाण पूजन जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते सप}ीक करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार सुरूपसिंग नाईक होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावीत, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, जि.प. अध्यक्षा रजनी नाईक, जि.प.चे माजी अध्यक्ष भरत गावीत, मुख्य कार्यकारी अधिकारी रणवीर सोमवशी, सेवानिवृत्त साखर आयुक्त डी.बी. गावीत, द्वारकाधीश साखर कारखान्याचे संचालक सावंत, जिल्हा उपनिबंधक एस.वाय. पुरी, व्हा.चेअरमन सखाराम गावीत, शेतकरी सहकारी संघाचे सभापती अजित नाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दीपक नाईक, तहसीलदार सुनीता ज:हाड,  गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, सहायक पोलीस निरीक्षक  दीपक पाटील, नगरसेवक आरिफ बलेसरीया, अजय पाटील,  विरोधी गटनेते नरेंद्र नगराळे, प्रकाश पाटील, सुभाष कुंभार, विनोद नाईक, पं.स. उपसभापती दिलीप गावीत, छगन वसावे, फत्तेसिंग नाईक, मगन वळवी, विनोद नाईक, भामटू भिल, नथ्थू गावीत, लक्ष्मण कोकणी, सयाबाई नाईक, विना वसावे आदी उपस्थित होते.शिरीष नाईक म्हणाले की, शेतक:यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतात जास्तीत जास्त उसाचे उत्पादन घ्यावे व शेतक:यांनी बाहेर ऊस न देता आपला ऊस आदिवासी साखर कारखान्याला द्यावा. गेल्यावर्षी गुजरात राज्यातील साखर कारखान्यांना काही शेतक:यांनी ऊस दिला. परंतु अजूनही  पैसे मिळाले नाही. काही खाजगी साखर कारखाने वजनकाटय़ात फेरफार करून आदिवासी गोरगरीब व कष्टकरी  शेतक:यांची फसवणूक करून मापात पाप करतात. या सर्व बाबतीत निश्चित खात्री असलेल्या आदिवासी सहकारी साखर कारखान्यात आपला ऊस द्यावा, असे नाईक यांनी सांगितले.माणिकराव गावीत म्हणाले की, सुरूपसिंग नाईक यांच्या सहकार्याने तालुक्यात  आदिवासी जनतेचा शाश्वत विकास केला आहे. तालुक्यात धरणे बांधून शेतीसाठी पाण्याची सोय केली आहे. यातून तालुक्याचा विकास झाला आहे. तालुक्यात चार हजार मेट्रीक टन उसाची लागवड करण्यात आली आहे. आदिवासी साखर कारखान्यात शेतक:यांची लूट होत नाही. आज घरापासून ते शेतार्पयत ट्रॅक्टर व मोटारसायकलीने शेतकरी जात  आहेत याचे आम्हाला समाधान आहे, असे ते म्हणाले. सूत्रसंचालन दिलीप पवार यांनी केले. कार्यक्रमासाठी आदिवासी सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचा:यांनी परिश्रम घेतले.