साखरेपेक्षा गूळच खातोय भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:21 IST2021-06-28T04:21:19+5:302021-06-28T04:21:19+5:30
साखरेच्या किमती कमी असल्यातरी गुळाचा वापर जास्त वाढत चालला आहे. कारण गूळ नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात येत असल्याने त्यामुळे ...

साखरेपेक्षा गूळच खातोय भाव
साखरेच्या किमती कमी असल्यातरी गुळाचा वापर जास्त वाढत चालला आहे. कारण गूळ नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात येत असल्याने त्यामुळे विविध आजारांवर उपायकारक ठरत आहे. मधुमेह, स्थूलपणा यासह अनेक आजारांसाठी उपयुक्त असल्याने गुळाचा वापर वाढत आहे.
गुळाचा चहा बनला स्टेटस
ऊस गोड वाटला तर मुळासकट खाऊ नये, अशी म्हण आहे. परंतु गूळ हा उसापासून तयार केला जातो. दरम्यान, साखरेपेक्षा गुळालाच भाव अधिक, असे दिसून येत आहे. गत दोन दशकांच्या आकडेवारीवर नजर घातल्यास साखरेपेक्षा गुळाचे भाव जास्त आहेत.
पारंपरिक गुळाचा वापर होत असताना साखर कारखान्यातून निर्मिती होत असल्याने सुरुवातीच्या काळात साखरेची कमी भावाने विक्री होऊ लागल्याने लोकांना साखरेची सवय लागली. त्यामुळे साखरेचा वापर जास्त झाल्याने मध्यंतरी साखरेला जास्त भाव मिळू लागला होता. त्यामुळे गुळाच्या किमती कमी झाल्याने गूळ खरेदीला प्राध्यान्य मिळू लागले होते.
नव्वदीच्या काळात गूळ पारंपरिक पद्धतीने काढण्यात येत नसल्यानेे, चांगला प्रतिचा गूळ मिळत नसल्याने गुळाला दर कमी मिळू लागल्याने गुळाला गरिबीचे लक्षण समजले जाऊ लागले होते. तसेच गरिबांना पारंपरिक गूळ वापरण्याची सवय असल्याने साखरेच्या वापरा उशिरा चालना मिळाली.
सुरुवातीच्या काळात साखर स्वस्त मिळत असल्याने लोकांना त्यांची सवय लागली होती. त्यामुळे साखरेचा वापर वाढल्याने किमती वाढल्या मध्यातरी गुळाच्या किमती कमी असल्याने गूळ वापराला प्राधान्य मिळू लागल्याने गुळाच्या किमती वाढू लागल्या आहेत.
- सुभाष पाटील, दुकानदार
सीझनमध्ये गुळाला अधिक मागणी असते. मात्र, त्या तुलनेने साखरेचाही खप अधिक आहे. आता काळानुरूप बदल होत असला तरी अनेकजण गुळाचा चहा प्यायला लागल्याचेही सांगतात. दरम्यान, शहरातील बाजारपेठेत गुळाचे भाव वधारले आहेत.
वर्षामध्ये सीझननुसार गुळाला अधिक मागणी होत असते. मात्र त्या तुलनेत साखरेची विक्री जास्त प्रमाणात होत असली तरी काळानुरूप बदल होत असल्याने अनेक जणांना गुळाचा चहा प्यायला लागल्याने त्यादरम्यान शहरातील बाजारपेठेतच गुळाचे भाव वाढताना दिसून येत आहेत.
- राजू ओसवाल, दुकानदार
गावात मात्र साखरच
ग्रामीण भागात गुळाच्या किमती कमी असताना गुळाचा खप होता. मात्र गुळाच्या किमती साखरेच्या पुढे गेल्याने ग्रामीण भागात साखरेचा खप जास्त होऊ लागला आहे. साखरेच्या आणि गुळाच्या किमतीत १५ ते २० रुपयांचा फरक येत असल्याने सध्या गावात साखरेची खरेदी जास्त होताना दिसून येत आहे.
- युवराज अग्रवाल, दुकानदार