शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
2
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
3
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
4
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
5
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
6
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
7
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
9
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
10
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
11
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
12
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
13
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
14
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
15
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
16
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
17
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
18
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
19
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

असलाेद गावाला लाॅकडाऊनचे फळ घरवापसी केेलेल्या भूमीपुत्रांना सत्तेचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 12:55 PM

हिरालाल रोकडे लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  शासनाने जाहीर केलेले लॉकडाऊन तालुक्यातील असलोद गावासाठी फलदायी ठरले आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी-व्यवसायातून ...

हिरालाल रोकडेलोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  शासनाने जाहीर केलेले लॉकडाऊन तालुक्यातील असलोद गावासाठी फलदायी ठरले आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी-व्यवसायातून इतर जिल्ह्यांत वास्तव्यास असलेले  बऱ्याच वर्षांनंतर गावात थांबले. यादरम्यान त्यांनी गावाच्या समस्या जाणून घेत त्या सोडविल्या हाेत्या. या विश्वासातून थेट ग्रामपंचायत निवडणूक विजयाची गवसणी घालण्याची किमया त्यांनी करुन दाखवल्याने तालुक्यात या अनोख्या विजयाची चर्चा सुरु झाली आहे.  लॉकडाऊनच्या कालावधीत नोकरी-व्यवसायानिमित्त इतरत्र असणारे गावकरी प्रथमच दीर्घकाळ थांबून होते. बहुतांश खासगी नोकरी करुन उदरनिर्वाह करणारे समविचारी असल्याने लाॅकडाऊन काळात गावातील समस्या दिसून आल्याने त्या सोडवण्याचा चंगच त्यांनी बांधला. यातून एका सेवाभावी संंस्थेची स्थापन केली. यातून त्यांनी सर्वप्रथम गावातील विहिरीवर विजेचा ट्रान्सफार्मर बसवून पाण्याची सोय केली. यामुळे गावकऱ्यांना मुबलक पाणी वेळेवर उपलब्ध होऊ लागले. त्याचप्रमाणे गावात व इतर ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलनाचा प्रयत्न केला. दारूबंदीसाठी प्रयत्न करून अवैधरीत्या विक्री होत असलेल्या दारूची दुकाने बंद केली. यासह गावातील विकासासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वपूर्ण बाबींची पूर्तता त्यांनी केली. संस्थेच्या माध्यमातून गावात होत असलेल्या कामांचे फलित पाहून ग्रामस्थांनी त्यांना ग्रामपंचायत निवडणूक लढविण्याचा आग्रह केला. गावकऱ्यांच्या आग्रहाखातर ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गुलाब भील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नऊ जागा लढविल्या. पैकी आठ जागेवर त्यांचे उमेदवार निवडून आले आहेत, तर उर्वरित तीन जागांवर अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. विशेष म्हणजे यातील सात नवनिर्वाचित सदस्य  अवघ्या ३५ ते ४० वयोगटातील आहेत. सर्वांनी गावातील सत्ताधाऱ्यांंचा पराभव केल्याने गावात सोमवारी आंनदोत्सव साजरा होत होता. 

   पाच वर्षांचा संकल्प मांडला पॅनेल प्रमुख राजू वानखेडे व उप पॅनेल प्रमुख संजय जगताप, दरबार गिरासे, जगन शिरसाठ, योगेश मराठे, तसेच युवक व ज्येष्ठ कार्यकर्ते यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत निवडणुकीत असलोद बीएसपी गाव विकास पॅनेलच्या नऊ पैकी सात उमेदवारांचा  विजय झाला. येत्या पाच वर्षांचा संकल्प त्यांनी मांडला होता.

   गावात परतले सरला अजय गिरासे, प्रकाश गुलाब भील, सुशीलाबाई प्रकाश भील, विलास प्रकाश पवार, संतोष देवीदास चव्हाण, अजय सोनवणे बिनविरोध, सुलोचना दिलीप पवार, अजय दाजू सोनवणे, तुकीबाई प्रकाश भील, रेखा लीलाचंद पवार, दीपक भीमसिंग गिरासे हे विजयी झाले आहेत. त्यांनी सत्ताधारी पॅनलचे उमेदवार पराभूत केले. 

असलोद पॅटर्नची चर्चा : सामाजिक कार्य करत गावाचे लक्ष वेधून घेणा-या नोकरदारांच्या या प्रयत्नांना तालुक्यात असलोद पॅटर्न म्हणून बघितले जात आहे. तशी चर्चा सध्या तालुक्यात आहे. ­