The power company's storeroom was broken into and two lakh items were removed | वीज कंपनीचे स्टोअररुम फोडून दोन लाखाचे साहित्य लांबवले

वीज कंपनीचे स्टोअररुम फोडून दोन लाखाचे साहित्य लांबवले


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा शहरातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील स्टोअररुम फोडून सुमारे दोन लाख रुपयांचे साहित्य चोरीस गेले आहे़ ३१ मे रोजी दुपारी दोन ते चार वाजेदरम्यान हा प्रकार घडला होता़
शहादा शहरात विज कंपनीच्या कार्यालयात स्टोेअर रुम आहे़ रविवारी दुपारच्या सुमारास स्टोअर रुमचा पत्रा सिमेंटचा पत्रा तोडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला होता़ चोरट्यांनी आतमध्ये ठेवलेले वीज कंपनीचे थ्री फेज एम्पीयर, ५४ मीटर, सिंगल फेज एम्पीयर, १९ मीटर असा १ लाख ९२ हजार ९३० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला़ हा प्रकार उघडकीस आल्यानंतर वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे़ चोरीला गेलेले सर्व साहित्य हे नवीन असल्याची माहिती आहे़ दरम्यान चोरट्याने येथे ठेवलेले शासकीय कागदपत्रेही चोरुन नेल्याने याप्रकाराचे गूढ वाढले आहे़
याप्रकरणी वीज कंपनीचे सहायक अभियंता तिरुपती तुकाराम पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरोधात शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: The power company's storeroom was broken into and two lakh items were removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.