शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीचा पदभार एकाकडे तर दप्तर मात्र दुसऱ्याचकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 13:20 IST

 हंसराज महाले लोकमत न्युज नेटवर्क कोठार :  तळोदा तालुक्यातील ग्रामपंचातींचा पदभार एका ग्रामसेवकाकडे तर दप्तर दुसऱ्याच ग्रामसेवकाकडे असल्याचे प्रकार ...

 हंसराज महालेलोकमत न्युज नेटवर्ककोठार :  तळोदा तालुक्यातील ग्रामपंचातींचा पदभार एका ग्रामसेवकाकडे तर दप्तर दुसऱ्याच ग्रामसेवकाकडे असल्याचे प्रकार सामोरे आहे. नवनियुक्त ग्रामसेवकाकडे चार्ज दिल्यानंतर तब्बल पाच ते सहा महिन्यांचा कालावधी उलटूनदेखील पूर्वीचे ग्रामसेवक संपूर्ण दप्तर सोपवायला का तयार नाहीत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तळोदा पंचायती समिती अंतर्गत ग्रामसेवकाच्या पदभार असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये बदल करण्यात आला होता. त्यातच बाहेरील जिल्ह्यातून बदल्या होऊनदेखील काही  ग्रामसेवक फेब्रुवारी, मार्च महिन्यात तळोदा पंचायत समितीत रुजू झाले  होते.ग्रामसेवकाच्या रिक्त पदांमुळे काही ग्रामसेवकाकडे दोन ते तीन ग्रामपंचायतीचा पदभार होता. परंतु बाहेरील जिल्ह्यातील ग्रामसेवक तळोदा पंचायत समितीत रुजू झाले असताना अतिरिक्त पदभार असणाऱ्या ग्रामसेवकाकडून पदभार त्यांच्याकडे देणे अपेक्षित असताना त्यांना अनेक दिवस कोणत्याही ग्रामपंचायतीचा पदभार सोपविण्यात आल्याचे  सांगितले जाते. दरम्यान,नंतरच्या कालावधीत तळोदा पंचायत समितीअंतर्गत ग्रामसेवकांच्या ग्रामपंचायतींची अदलाबदल करण्यात आली. नवीन ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकांना पूर्वीचा पदभार असणाऱ्या ग्रामसेवकानी त्यांना चार्ज दिला, पण दप्तर मात्र दिले नसल्याचा प्रकार समोरे आला.तळोदा तालुक्यातील सिलिंगपूर ग्रामपंचायतीबाबत हा प्रकार घडला आहे. पूर्वीच्या ग्रामसेवकाने नव्याने पदभार सोपविण्यात आलेल्या ग्रामसेवकाकडे चार्ज दिला खरा सध्या ग्रामपंचायतीचे दप्तर सोपविताना ते अपूर्ण सोपविले. त्यामुळे सध्या पदभार असणाऱ्या ग्रामसेवकाकडून गेल्या वर्षभरात गावात ग्रामविकासाच्या योजनांची व अन्य बाबींची माहिती विचारणाऱ्या नागरिकांना संबंधित पदभार असणारा ग्रामसेवक माहिती देता येत नसल्याची स्थिती आहे. माहिती अधिकार कायद्याअंतर्गत माहिती मागणाऱ्यांनादेखील विहित मुदतीत ग्रामसेवक माहिती उपलब्ध करून द्यायला असमर्थ ठरले असून, प्रथम अपीलच्या सुनावणी दरम्यान संबंधित ग्रामसेवकाने त्याची अडचण प्रथम अपिलीय अधिकाऱ्यापुढे बोलून दाखविली. या सर्व प्रकारांमुळे पूर्वीचे ग्रामसेवकाने सुमारे सहा महिन्यांचा कालावधी पूर्ण अद्याप संपूर्ण दप्तर का सोपविले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. असा प्रकार इतर ग्रामपंचायतीच्या बाबतीतदेखील असण्याची शक्यता असून, संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी करण्याची गरज आहे. दरम्यान, तळोदा पंचायत समितीअंतर्गत ग्रामसेवकांना देण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पदभाराबाबत मोठ्या प्रमाणात तर्कवितर्क लावले जात असून, ग्रामपंचायती विशिष्ट ग्रामसेवकांना जाणीवपूर्वक मलाईदार व जास्तीच्या ग्रामपंचायतीचा पदभार देण्यात येत असल्याचीदेखील  जोरदार चर्चा आहेत. या प्रकाराकडे वरिष्ठ प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

सुनावणी दरम्यान विद्यमान जन माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक ग्रामपंचायत सिलिंगपूर यांनी समक्ष कथन केले की, तत्कालीन ग्रामसेवक यांनी परिपूर्ण दप्तर मला चार्ज यादीसह दिले नाही. त्यानुसार मला सदरची माहिती संबंधितांना उपलब्ध करून देता आली नाही. तत्कालीन ग्रामसेवक यांना परिपूर्ण दप्तर विद्यमान ग्रामसेवक यांना तात्काळ तीन दिवसाच्या आत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.        - आर के जाधव, विस्तार अधिकारी, (ग्रामपंचायत)पंचायत समिती, तळोदा