शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

दहा दिवसांत दहा टक्क्यांनी वाढला पॅाझिटिव्हिटी रेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:27 IST

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ हळूहळू कमी होत आहे. दररोज आढळणाऱ्या बाधितांची संख्यादेखील ३०० च्या घरातच राहत आहे. सुदैवाची ...

नंदुरबार : जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ हळूहळू कमी होत आहे. दररोज आढळणाऱ्या बाधितांची संख्यादेखील ३०० च्या घरातच राहत आहे. सुदैवाची बाब म्हणजे दहा दिवसांत रिकव्हरी रेट हा दहा टक्क्यांनी वाढला आहे. सध्या रिकव्हरी रेट हा ७६ टक्के असून, तो ९० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ मार्च महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून कमालीचा उंचावला होता. गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत थोडा दिलासा मिळू लागला आहे. त्यातही कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने कोरोना संकटातही आशेचा किरण दिसू लागला आहे. येत्या काळात कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासह रिकव्हरी रेट वाढविण्यासाठी प्रशासनाचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.

दहा टक्के वाढ...

जिल्ह्यात दहा दिवसांत कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दहा टक्क्यांनी वाढले आहे. १५ एप्रिल रोजी एकूण रुग्णसंख्या २८ हजार १८७ होती. त्यातील १८ हजार ६२६ रुग्ण बरे झाले होते. त्याची टक्केवारी ही ६६.०८ टक्क्यांपर्यंत होती, तर २५ एप्रिल रोजी एकूण रुग्णसंख्या ३२ हजार ८६३ होती. त्यातील २५ हजार सात रुग्ण हे बरे झाले आहेत. त्यामुळे बरे होण्याची टक्केवारी ही ७६ टक्के इतकी आहे. अर्थात दहा दिवसांत पॅाझिटिव्हिटी रेट हा १० टक्क्यांनी वाढला आहे.

वाढत्या सुविधांचा परिणाम

जिल्ह्यात कोरोनावर उपचारासाठी वाढविण्यात आलेल्या सेवा व सुविधा पाहता बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. येत्या काळात आणखी बेडची संख्या आणि आरोग्य सेवा वाढविल्या जाणार असल्यामुळे कोरोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढण्याची अपेक्षा आहे.

दर ९० टक्क्यांपर्यंत नेणार

जिल्ह्यात रिकव्हरी रेट हा ९० टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी प्रशासन व आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या सुरू असलेली कडक संचारबंदी व त्यामुळे कोरोना साखळी तुटण्याचे प्रमाण पाहता ९० टक्के रिकव्हरी रेट साध्य करता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रुग्णसंख्याही होतेय कमी

सध्या रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणदेखील कमी झाले आहे. १९ एप्रिल रोजी २८६ रुग्ण आढळून आले होते. २० रोजी २६५, २१ रोजी २५६, २२ रोजी २९३, २३ रोजी ४५९, २४ एप्रिल रोजी ४२७ रुग्ण आढळून आले आहेत. अर्थात चाचण्यांची संख्या वाढविली असल्यामुळे रुग्णसंख्यादेखील वाढत आहे.

अशी आहे आकडेवारी

१५ एप्रिल रोजी एकूण २८ हजार १८७ रुग्ण होते. त्यातील १८ हजार ६२६ रुग्ण बरे झाले. त्यांचा रिकव्हरी रेट हा ६६.०८ टक्के होता.

२५ एप्रिल रोजी एकूण रुग्णसंख्या ही ३२ हजार ८६३ पर्यंत गेली. त्यातील २५ हजार सात रुग्ण बरे झाले. त्यांचा रिकव्हरी रेट हा ७६ टक्के इतका राहिला.

आतापर्यंत एकूण एक लाख पाच हजार ६९ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

सध्या ३२५ जण आयसोलेशन कक्षात उपचार घेत आहेत.

जनरल क्वारंटाइन जवळपास चार हजार ५३५ इतके आहेत.