शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळ पर्यटनस्थळाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:38 IST

तोरणमाळ हे राज्यातील नंबर दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथील निसर्गरम्य वातावरणाने पर्यटकांना चांगलीच भुरळ घातली आहे. ...

तोरणमाळ हे राज्यातील नंबर दोनचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथील निसर्गरम्य वातावरणाने पर्यटकांना चांगलीच भुरळ घातली आहे. त्यामुळे साहजिकच एक-दोन दिवसांच्या निसर्ग पर्यटनासाठी पर्यटक येथे येत असतात. तथापि, गेल्यावर्षी कोरोना महामारीने संपूर्ण जगातच धुमाकूळ घातला होता. परिणामी शासनाच्या लाॅकडाऊनमुळे पर्यटन स्थळांना फटका बसला होता. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढून नये म्हणून पर्यटनस्थळेही बंद करण्यात आली होती. त्यानंतर आता कोरोनाचा प्रभाव कमी व्हायला लागल्याने शासनाने पर्यटनस्थळे खुली केली आहेत. साहजिकच जिल्ह्याबरोबरच जवळील गुजरात व मध्य प्रदेश सीमेवरील पर्यटक कोरोना काळातील कंटाळवाणा घालवण्यासाठी तोरणमाळ येथे निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी हजेरी लावत आहेत. विशेषत: जिल्ह्यातील जे नागरिक, विद्यार्थी परदेशात देशात होते परंतु कोरोनामुळे आपल्या गावात सध्या वास्तव्यास आहेत असे पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. मात्र येथे आल्यानंतर येथील सर्वच पॉईंटसची अवस्था पहिल्यानंतर मोठे विदारक चित्र दिसून येत असल्याने त्यांच्याकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जवळपास सर्वच ठिकाणी कठडे तुटले आहेत. केव्हा खाईत तोल जाईल याची शाश्वती नाही. त्यामुळे ते पॉईंट अत्यंत धोकादायक ठरले आहेत. अंतर्गत रस्त्यांचीदेखील अक्षरशः चाळण झाली आहे. पुलाचीही दुरवस्था झाली आहे. वास्तविक या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी मोठा वाव आहे. कारण महाबळेश्वर, माथेराननंतर तोरणमाळच उंच स्थानावर आहे. शिवाय गुजरात, मध्य प्रदेशमधील पर्यटकांना जवळचे ठिकाण आहे. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ वाढू शकते. परंतु विकासाबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींनी उदासीन भूमिका घेतल्याने विकासापासून कोसो दूर आहे.

बॉटनीकल गार्डनमधील वनस्पती करपल्या

वनविभागाने वनौषधींसाठी जतन केलेल्या बॉटनीकल गार्डनमधील वनस्पती पाण्याअभावी करपत आहेत. तेथील रस्त्यावरील फरशादेखील पूर्णत: उखडल्या आहेत. स्वच्छताही केली जात नाही. एकेकाळी घनदाट जंगलांनी वेढलेला तोरणमाळ आता भकास दिसत असल्याची व्यथा काही पर्यटकांनी बोलून दाखवली आहे. इतर पॉईंटसचीही दुरवस्था झाली आहे. सीताखाई व इतर खोल दरीच्या ठिकाणी असलेले संरक्षक कठडे तुटल्याने ते धोकादायक बनले आहे.

कोरोना महामारीमुळे गावाकडे आली होती. शासनाने पर्यटनस्थळे खुली केल्यामुळे एका दिवसाच्या पर्यटनासाठी तोरणमाळ येथे आली होती. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून नाव ऐकले आहे. साहजिकच चांगल्या सुविधा असतील अशी भावना होती. परंतु येथे आल्यानंतर येथील सुविधांचे विदारक चित्र दिसून आले. सर्वच पॉईंटची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधी व शासनाने विकासाबाबत लक्ष घातले पाहिजे.

-धनश्री पाटील, पर्यटक, खारघर (मुंबई)