शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवकाच्या अरेरावीबाबत पोलिसात निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पालिका अधिकारी व कर्मचा:यांशी अरेरावीची भाषा वापरुन विभाग प्रमुखांशी वाद घालून पैशांची मागणी करणा:या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पालिका अधिकारी व कर्मचा:यांशी अरेरावीची भाषा वापरुन विभाग प्रमुखांशी वाद घालून पैशांची मागणी करणा:या येथील नगरसेवकाचा निषेध करीत शहादा पालिकेच्या अधिकारी व कर्मचा:यांनी गुरुवारी कामबंद आंदोलन केले. याबाबत शहादा पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले.संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहादा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक शेख इक्बाल शेख सलीम यांनी  6 नोव्हेंबर रोजी आरोग्य विभागातील स्वच्छता पर्यवेक्षक गफ्फार पिंजारी यांना फोन करून पाच हजार रुपयांची मागणी केली. तसेच मुख्याधिकारी राहुल बाबाजी वाघ व आरोग्य विभाग प्रमुख राजू महादू चव्हाण यांना ईल भाषेत  शिवीगाळ केली. याबाबतची ध्वनिफीतही  (सीडी) निवेदनासोबत सादर करण्यात           आली आहे. नगरसेवक शेख इक्बाल हे वारंवार कार्यालयात येऊन महिला कर्मचा:यांसमोर ईल भाषेत शिवीगाळ करतात. विद्युत, आरोग्य, बांधकाम या विभागात वारंवार तोंडी खोटय़ा तक्रारी करून माङो काम होत नाही असे म्हणत अधिकारी व कर्मचा:यांना अर्वाच्य भाषेत दमदाटी करून हाणामारी करण्याची व ‘मेरा कोण क्या कर लेगा’ अशी धमकी देतात. पालिकेचे कर्मचारी या नगरसेवकाच्या वागणुकीचा मानसिक त्रास सहन करीत असून कर्मचा:यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले   आहे.संबंधित नगरसेवक शेख इक्बाल शेख सलीम यांच्यावर जिल्हाधिकारी, यांच्याकडून तीन अपत्य असल्याबाबत नगरसेवक पद रद्द केल्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. परंतु संबंधित खात्याचे राज्यमंत्री यांच्याकडे याबाबतची सुनावणी पूर्ण होऊन शासनाकडून नगरसेवक पद रद्द होणेसंदर्भात निकाल प्रलंबित आहे. संबंधिताची सार्वजनिक ठिकाणी वर्तणूक व वागणूक अशोभनीय असून अशा प्रकारामुळे शहराची शांतता व सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी कर्मचा:यांतर्फे निवेदन देण्यात आले आहे. या प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून संबंधितावर योग्य कारवाई करण्याची विनंतीही करण्यात आली आहे. निवेदनावर पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, स्वच्छता निरीक्षक राजू चव्हाण, प्रशासकीय अधिकारी माधव गजरे, अभियंता संदीप टेंभेकर, पाणीपुरवठा अभियंता संदीप चौधरी, संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र सैंदाणे आदींच्या सह्या आहेत