शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
4
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
5
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
6
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
7
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
8
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
9
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
10
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
11
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
12
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
13
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
14
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
15
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
16
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
17
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
18
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
19
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
20
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात रेल्वे रोकोला जाणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:21 IST

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिल्ली संयुक्त किसान आंदोलनाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार,१८ रोजी देशव्यापी रेल्वे आंदोलन ...

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिल्ली संयुक्त किसान आंदोलनाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार,१८ रोजी देशव्यापी रेल्वे आंदोलन पुकारण्यात आले होते. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेने नंदुरबार, नवापूर, खांडबारा या रेल्वे स्थानकांवर आंदोलनाची तयारी केली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अगोदरच नंदुरबार रेल्वे स्थानकाच्या बाहेर पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावला होता.

सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे लीलाबाई वळवी, सेक्रेटरी विक्रम गावीत, संघटक करणसिंग कोकणी, उपाध्यक्ष जमना ठाकरे रेल्वे रोको आंदोलनासाठी दुपारी स्थानकावर दाखल झाले. पदाधिकारी व कार्यकर्ते रेल्वे रोको आंदोलनासाठी रेल्वे स्थानकात जात असताना त्यांना पोलिसांनी रेल्वे रोको आंदोलन करण्यास मज्जाव करीत प्रवेश नाकारला. यावेळी सेक्रेटरी कॉ. विक्रम गावीत व पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना अधिकाऱ्यांना आंदोलन करण्याची विनंती केली. परंतु पोलिसांनी स्थानकात जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलकांना रेल्वे रोको आंदोलन करता आले नाही.

स्थानक प्रबंधकांना आंदोलकांचे निवेदन

अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने दिल्ली संयुक्त किसान आंदोलनाकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनांच्या माध्यमातून देशव्यापी रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून नंदुरबार रेल्वे स्थानकावर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्यावतीने रेल्वे रोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती. परंतु,स्थानकात पोलिसांनी प्रवेश नाकारल्यामुळे परिसरात आंदोलकांनी निदर्शने करीत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानक प्रबंधकांना निवेदन दिले. निवेदनावर अध्यक्ष कॉ. लीलाबाई वळवी, सेक्रेटरी कॉ.विक्रम गावीत, संघटक कॉ.करणसिंग कोकणी,उपाध्यक्ष कॉ. जमना ठाकरे,कॉ. मनोहर वळवी,कॉ. फत्तेसिंग कोकणी, कॉ.बकराम वळवी, कॉ.बाबुराव ठाकरे,कॉ. वळवी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बंदूकधारी पोलीस बंदोबस्त

२६ जानेवारी रोजी राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी शहर पोलीस ठाणे, रेल्वे मार्ग पोलीस स्टेशन व रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्थानकात सकाळपासूनच बंदोबस्त लावला होता. बंदोबस्तात बंदूकधारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समावेश होता.