तळोद्यात मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 13:08 IST2020-02-26T13:08:23+5:302020-02-26T13:08:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा शहरातील मीरा कॉलनीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर तळोदा पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री धाड टाकून ...

Police raid at gambling base at midnight | तळोद्यात मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड

तळोद्यात मध्यरात्री जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तळोदा शहरातील मीरा कॉलनीत सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर तळोदा पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री धाड टाकून पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला़ पहाटेपर्यंत ही कारवाई सुरु होती़
रविवारी रात्री पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांना तळोदा शहरातील मीरा कॉलनीत जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार त्यांनी रविवारी रात्री संबधित ठिकाणी पाहणी करुन पडताळणी केली असता, जुगार सुरु असल्याचे दिसून आले़ त्यांनी तातडीने पोलीस पथकासह धाड टाकली़ यावेळी घटनास्थळावर १० जण जुगार खेळत असल्याचे दिसून आले़ या कारवाईत ३१ हजार ८०० रुपयांची रोकड, पाच मोटरसायकली, असा एकूण १ लाख ७३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला़ याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास पाटील यांनी तळोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन सय्यद इद्रिस अली, योगेश सुरेश पवार, जितेंद्र राजेंद्र केदार, अश्विन राजेंद्र केदार, प्रमोद कोळी, जावेद कुरेशी, अल्लू कुरेशी, गोविंद पाडवी यांच्यासह दोघा फरार इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय ठाकरे करत आहेत़
या घटनेचे वृत्त शहरात पसरताच मिरा कॉलनीत एकच गर्दी झाली होती़ रहिवासी वसाहतीत सुरु असलेल्या या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा सुरु असून पळालेले ते दोघे कोण, याची चर्चा रंगत आहे़

Web Title: Police raid at gambling base at midnight