शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी युवकांसाठी चालविलेले पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदूरबार : युवकांनी युवकांसाठी आयोजित केेलेल्या पोलीस व सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षणाचा अनोखा उपक्रम सैताणे, ता.नंदूरबार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदूरबार : युवकांनी युवकांसाठी आयोजित केेलेल्या पोलीस व सैन्य दल भरतीपूर्व प्रशिक्षणाचा अनोखा उपक्रम सैताणे, ता.नंदूरबार येथील युवकांनी हाती घेतला आहे. शासकीय सहाय्य न घेता या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या पहिल्या चाचणी परीक्षेला १२५ पेक्षा अधिक युवकांनी मैदानी व लेखी परीक्षेत सहभाग घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’च्या आवाहनाला या युवकांनी प्रतिसाद दिल्याचेच चित्र आहे.

ग्रामीण भागातील, आपल्या गाव परिसरातील जास्तीत जास्त युवक पोलीस व सैन्यदलात सहभागी व्हावे, बेरोजगारीवर त्यांना मात करता यावी या उद्देशाने सैताणे येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे संचालक हर्षल पाटील यांनी गावातील माजी सैनिक रावसाहेब पाटील, सध्या कार्यरत सैन्यदलातील जवान अशोक पाटील यांचे सहकार्य घेत व भूमिपुत्र परंतु विरार येथे अकॅडमी चालविणारे विकास सोनवणे व योगेश पाटील यांचे सहकार्य घेत या प्रशिक्षणाला सुरुवात केली. त्याला युवकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला आहे.

मैदानी व लेखी परीक्षा

प्रशिक्षणानंतर या युवकांची पोलीस व सैन्य दलाच्या भरतीसाठी ज्या प्रकारे मैदानी व लेखी परीक्षा घेतली जाते त्याप्रमाणे परीक्षेेचे आयोजन करण्यात आले. त्यासाठी गावठाणच्या जागेवर मैदान तयार करण्यात आले. तेथे धावणे, पुशअप यासह इतर मैदानी चाचणीसाठी आवश्यक सर्व सोय करण्यात आली. पहाटे ६ वाजेपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली. दुपारी १२ वाजेपर्यंत सर्वच १३३ युवकांची मैदानी परीक्षा झाली. दुपारी भोजन अवकाश देण्यात आल्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आली.

सैन्यदल भरतीसाठी १०० गुणांची मैदानी व ५० गुणांची लेखी परीक्षा घेतली गेली तर पोलीस भरतीसाठी १०० गुणांची लेखी व १०० गुणांची मैदानी परीक्षा झाली. या परीक्षेतूनही प्रत्येकी तीन क्रमांक काढण्यात आले. त्यांना प्रोत्साहन म्हणून रोख रकमेची बक्षिसे देखील देण्यात आली.

अभ्यासिकेची मदत

गावात स्वामी विवेकानंद अभ्यासिका सुरू आहे. या ठिकाणी जास्तीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाची पुस्तके आहेत. त्या माध्यमातून युवक अभ्यास करतात. याशिवाय वेळोवेळी स्पर्धा परीक्षा व्याख्यानांचे देखील आयोजन केले जाते. त्याचाही फायदा युवकांना होत आहे.

शहरी भागात पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी गरीब घरातील युवकांना राहण्याचा, खाण्याचा तसेच इतर खर्च पेलवत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित करून युवकांची तयारी करून घेण्यासाठी केलेला हा उपक्रम जिल्ह्यातील किंबहुना खान्देशातील पहिलाच असण्याची शक्यता आहे. या उपक्रमात गावातील युवक मंडळी आणि ग्रामस्थांचे मोठे सहकार्य लाभल्याचे संयोजक हर्षल पाटील यांनी सांगितले.

चौकट...

पोलीस व सैनिकांचे गाव...

n सैताणे गावातील अनेक जण पोलीस दलात कार्यरत आहेत. याशिवाय सैन्यदलात देखील काहीजण आहेत. सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या जवानाचे गावात आल्यावर अनोख्या पद्धतीने स्वागत करण्याची परंपरा येथे आहे. याशिवाय पोलीस व सैन्यदलात असलेल्यांकडून गावातील युवकांना नेहमीच मार्गदर्शन केले जाते. त्यांच्या एकत्रित प्रयत्नात गावातील बेरोजगार युवकांसाठी अशा प्रकारचे कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र तयार व्हावे अशी अपेक्षा युवकांमधून व्यक्त होत आहे.

शास्त्रोक्त पद्धतीचा वापर...

n मैदानी व लेखी परीक्षा अगदी शास्त्रोक्त पद्धतीने घेण्यात आली. दोन्ही भरतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची काटेकोर अंमलबजावणी करण्यात आली. त्यासाठी विरार येथे अकॅडमी चालविणाऱ्या दोन जणांना बोलविण्यात आले होते.

n या प्रशिक्षण व स्पर्धेत नंदूरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील काही युवकही सहभागी झाले होते. बाहेरगावच्या युवकांची दुपारच्या भोजनाची व्यवस्था तसेच आदल्या दिवशी रात्री राहण्याची व्यवस्था गावातच करण्यात आली होती.

कोट..

गाव व परिसरातील युवकांना रोजगार मिळावा, स्पर्धा परीक्षेत ते यशस्वी व्हावे यासाठी स्वामी विवेकानंद अभ्यासिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याच अंतर्गत पोलीस व सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण राबविण्यात आले. याचा फायदा युवकांना येत्या काळात होऊ घातलेल्या भरतीसाठी होईल. या उपक्रमात ग्रामस्थांचे मोठे सहकार्य मिळाले.

-हर्षल पाटील, संयोजक, आर्मीमॅन युवा परिक्षार्थी, सैताणे, ता.नंदूरबार.