पोलीस कर्मचा:याचा तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 11:35 IST2019-08-27T11:35:53+5:302019-08-27T11:35:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणा:या पोलीस मुख्यालयातील कर्मचा:याविरुद्ध 25 ऑगस्ट रोजी रात्री म्हसावद ...

Police Personnel: This abused the young woman | पोलीस कर्मचा:याचा तरुणीवर अत्याचार

पोलीस कर्मचा:याचा तरुणीवर अत्याचार

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणा:या पोलीस मुख्यालयातील कर्मचा:याविरुद्ध 25 ऑगस्ट रोजी रात्री म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीतास अटक करण्यात आली आहे.
विश्वास रंजन वळवी (31) पोलीस शिपाई, मुख्यालय, रा.नटावद, ता.नंदुरबार असे संशयीताचे नाव आहे.  विश्वास वळवी याने तरुणीस प्रेमाच्या जाळ्यात घेत तिला शहादा, शिर्डी, मनमाड, गुजरात व नटावद येथे घेवून जात तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तरुणीशी विवाह करण्यास त्याने नकार दिला. आपण फसविलो गेल्याचे लक्षात आल्यावर तरुणीने म्हसावद पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. तरुणीच्या फिर्यादीवरून पोलीस शिपाई विश्वास वळवी विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक धनराज निळे करीत आहे.  संशयीतास 26 रोजी पहाटे अटक करण्यात आली आहे.     
 

Web Title: Police Personnel: This abused the young woman