लोकसंघर्ष मोर्चाचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:23 IST2018-12-26T16:23:21+5:302018-12-26T16:23:25+5:30

नंदुरबार : सारंगखेडा ता़ शहादा येथे मुख्यमंत्र्यांच्या दौ:याआधीच लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतीभा शिंदे व सहाका:यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आह़े ...

Police officers arrested | लोकसंघर्ष मोर्चाचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

लोकसंघर्ष मोर्चाचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात

नंदुरबार : सारंगखेडा ता़ शहादा येथे मुख्यमंत्र्यांच्या दौ:याआधीच लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतीभा शिंदे व सहाका:यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आह़े लोकसंघर्ष मोर्चाकडून वनपट्टेधारकांच्या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याचे नियोजन होत़े परंतु खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून ही कार्यवाही करण्यात आली आह़े 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सारंगखेडा ता़ शहादा येथील चेतक फेस्टीवलला भेट देण्यासाठी बुधवारी येत आहेत़ त्या पाश्र्वभूमिवर वनपट्टेधारकांच्या विविध प्रश्नांवरुन फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतीभा शिंदे व पदाधिकारी येत असताना त्यांना पोलिस प्रशासनाकडून टाकरखेडा येथे रोखण्यात येऊन ताब्यात घेण्यात आले आह़े या वेळी मोर्चाच्या पदाधिका:यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचीही माहिती आह़े 

Web Title: Police officers arrested