नंदुरबार शहरात पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमिवर पोलिसांतर्फे वाहनांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 11:48 IST2017-11-27T11:48:15+5:302017-11-27T11:48:27+5:30

Police inspection by the police on the background of municipal elections in Nandurbar city | नंदुरबार शहरात पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमिवर पोलिसांतर्फे वाहनांची तपासणी

नंदुरबार शहरात पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमिवर पोलिसांतर्फे वाहनांची तपासणी

कमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : निवडणुकीच्या पाश्र्वभुमिवर शहरात येणा:या वाहनांची कसून चौकशी व तपासणी केली जात आहे. गेल्या आठवडय़ापासून ही मोहिम सुरू केली असली तरी सध्या तिला वेग देण्यात आला आहे.पालिका निवडणुकीच्या प्रचाराला जोर आला आहे. राजकीय पक्ष आपल्या नियोजनात व्यस्त आहेत. प्रशासन मतदानाच्या तयारीला लागले आहे. तर पोलीस प्रशासन आता बंदोबस्ताच्या नियोजनात गर्क आहे. निवडणुकांमध्ये मद्य आणि पैशांची मोठय़ा प्रमाणावर उलाढाल होते. ही बाब लक्षात घेता पोलिसांतर्फे विशेष दक्षता बाळगली जात आहे. गेल्या आठवडय़ापासून शहरात येणा:या वाहनांची तपासणी केली जात आहे. शहरातील चारही भागातील रस्त्यांवर कधीही अचानक ही मोहिम राबविण्यात येते. शिवाय रात्रीच्या वेळी गस्तीवरील पोलीस वाहनातील अधिकारी कर्मचारी शहरात येणा:या वाहनांवर नजर ठेवून त्यांची तपासणी करीत आहे. रविवारी देखील अनेक भागात वाहतूक पोलिसांतर्फे वाहनांची तपासणी करण्यात आली. वाहनचालकांनी पोलिसांना याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Police inspection by the police on the background of municipal elections in Nandurbar city